Royal Gold Biryani (Photo Credits-Instagram)

Royal Gold Biryani: कधी तुम्ही अशा बिर्याणी बद्दल ऐकले आहे का जी 23 कॅरेट सोन्याच्या गार्निशह तयार केली जाते. ही गोष्ट जरी चुकचुकल्यासारखी वाटेल पण याच बिर्याणीचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. ज्याची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल. खरंतर दुबईतील एक रेस्टॉरंट Bombay Borough मध्ये रॉयल गोल्ड बिर्याणी मिळते. ज्याची किंमत 19 हजारांहून अधिक म्हणजेच 19,707 रुपये आहे. 23 कॅरेट खाद्य सोन्यासह येणारी गोल्ड बिर्याणी दुबईतील सर्वाधिक महाग बिर्याणी आहे. जी दिसण्यात ऐवढी सुंदर आणि स्वादिष्ट असून ती पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटेल. या बिर्याणीचे फोटो सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत असून लोकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करत आहे.

रॉयल गोल्ड बिर्याणी ही सोन्याच्या एका ताटात वाढली जाते. ती तीन वेगवेगळ्या तांदुळापासून बनवली जाते. बिर्याणी तांदुळ, केमा तांदुळ, सफेद तांदुळ आणि केसर तांदुळ यांचा त्यामध्ये समावेश आहे. याचे वजन 3 किलोग्रॅम असल्याचे सांगितले जात आहे. तांदुळ बेबी पोटॉटो, उकडलेली अंडी, पुदीना, रोस्टेड काजू, अनार आणि तळलेल्या कांद्यासह गार्निशिंग केली जाते.(Urine in Coke Bottle: UK मध्ये जेवणाच्या ऑर्डरसह दिली मूत्राने भरलेली बाटली; फोटो व्हायरल होताच मील-किट कंपनी ने मागितली माफी) 

यानंतर कश्मीरी लॅब सीक कबाब, ओल्ड डेल्ही लॅब चॉप्स, राजपूत चिकन कबाब, मुघलाई कोफ्ता आणि मलई चिकन रोस्टसह भात दिला जातो. त्याचसोबत निहारी सालन, जोधपुरी सालन, बादामी सॉस, अनार रायता हे कॉम्प्लीमेंट्री म्हणून दिले जाते.अखेर ही डिश गोल्ड लीव्ससह गार्निश केली जाते. तर तुम्हाला सुद्धा ही बिर्याणी खायला आवडेल का?