गूगलच्या (Google) होमपेजवर आज डुडल French Painter Rosa Bonheur यांना अर्पित करण्यात आले आहे. रोसा बॉनहर (Rosa Bonheur) यांच्या 200 व्या जयंती निमित्त हे खास डूडल (Doodle) साकारण्यात आले आहे. रोझाच्या यशस्वी कारकिर्दीमुळे कला क्षेत्रातील महिलांच्या भावी पिढीला प्रेरणा मिळाली आहे. ग्राफिकमध्ये कॅनव्हासवर मेंढ्यांचा कळप रंगवणारी रोझा बॉनहरची अॅनिमेटेड मूर्ती आहे.
रोझा बॉनहर चा जन्म 16 मार्च 1822 मध्ये फ्रांसच्या Bordeaux येथे झाला. सुरूवातीला तिला चित्रकलेचे धडे वडिलांनी दिले. रोझाच्या काळात स्त्रियांनी कलाक्षेत्रात काम करणं हा निर्णय अपवादात्मक होता. कॅनव्हासवर चित्र साकरण्यापूर्वी ती चित्रकलेमध्ये होत असलेल्या बदलांचा, परंपरांचा बारकाईने अभ्यास करत असे.
New Google Doodle has been released: "Rosa Bonheur's 200th Birthday" :)#google #doodle #designhttps://t.co/OTjYB3P1u6 pic.twitter.com/lNO91u2bmN
— Google Doodles EN (@Doodle123_EN) March 15, 2022
प्राणी चित्रकार आणि शिल्पकार म्हणून रोझा बॉनहरची ख्याती 1840 मध्ये वाढायला सुरूवात झाली. तिची अनेक चित्रं 1841 ते 1853 या काळात प्रतिष्ठीत पॅरिस सलून मध्ये झळकली. 1849 मध्ये “Plowing in Nivernais,” या एक्झिबिशन मध्ये तिला व्यावसायिक कलाकार म्हणून ओळख मिळाली. 1853 मध्ये, बॉनहरने तिच्या "द हॉर्स फेअर" या पेंटिंगने आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली, ज्याने पॅरिसमध्ये आयोजित केलेल्या घोडेबाजाराचे चित्रण केले होते. तिचे सर्वात प्रसिद्ध काम म्हणून, हे चित्र न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये प्रदर्शनात लावण्यात आले आहे. नक्की पहा: International Women's Day 2022 Google Doodle: आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 निमित्त समाजात स्त्री निभावणार्या विविध रूपांनी सजलयं आजचं गूगल डूडल.
या प्रसिद्ध चित्रकलेचा सन्मान करण्यासाठी, French Empress Eugénie यांनी 1865 मध्ये बॉनहरला Legion of Honor हा देशाच्या सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक पुरस्कार दिला.