Racheal Kaur Takes Daily Flights for Job in Malaysia (Photo Credits: YouTube/@CNAInsider)

भारतीय वंशाची मलेशियन महिला तिचा संसार आणि करियर सांभाळण्यासाठी रोज विमान प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे. Racheal Kaur या असं तिचं नाव असून खर्‍या आयुष्यात ती 'super commuter' बनून जबाबदार्‍या सांभाळत आहे. AirAsia मध्ये Racheal Kaur या assistant manager म्हणून काम करत आहेत.पहाटे 4 वाजता उठून आठवड्याचे 5 दिवस त्या कामाच्या ठिकाणी विमानाने जातात. यामुळे पैसे आणि वेळ वाचत असल्याचं त्या सांगतात. Racheal Kaurयांना 12 वर्षाचा मुलगा आणि 11 वर्षाची मुलगी आहे. त्यांना वेळ देता यावा म्हणून त्या मलेशिया मध्ये Penang ते Kuala Lumpur,असा रोज विमानप्रवास करत आहेत.

CNA Insider ला मुलाखत देताना त्यांनी घर आणि काम सांभाळताना होत असलेल्या या कसरतीबद्दल माहिती दिली आहे. 2024 पासून असा प्रवास करत आहेत. दरम्यान आपली मुलं मोठी होत आहेत त्यांना आईची गरज आहे. विमानप्रवास हा एकच पर्याय आहे ज्यामुळे रोज रात्री मी मुलांसोबत राहू शकते असे Racheal Kaur म्हणाल्या आहेत.

कौर यांनी त्यांच्या कार्यालयाजवळ एक घर भाड्याने घेतले होते आणि आठवड्यातून एकदाच घरी परतत होत्य. या व्यवस्थेमुळे तिचे काम आणि संसार यामधील संतुलन बिघडले. अखेर त्यांनी दररोज उड्डाण करण्याचा पर्याय निवडला. त्यांच्या मते हा केवळ स्वस्तच नाही तर कुटुंबासमवेत अधिक वेळ देऊ शकण्याचा एकमेव मार्ग आहे. या नवीन सेटअपमुळे तिचा मासिक खर्च $474 (सुमारे ₹42,000) वरून $316 (जवळपास ₹28,000) पर्यंत कमी झाला आहे.

कसा असतो Racheal Kaur यांचा दिनक्रम

रचेल कौरचा दिवस पहाटे 4 वाजताच्या वेक-अप कॉलने सुरू होतो. त्या 5:55 चे फ्लाइट पकडण्यासाठी सकाळी 5 वाजता विमानतळावर निघतात, सकाळी 7:45 वाजता कामावर पोहोचतात आणि संपूर्ण दिवस ऑफिसमध्ये राहिल्यानंतर त्या रात्री 8 वाजता घरी जाण्यास निघतात. विमानतळापासून तिच्या ऑफिसपर्यंतच्या पाच-सात मिनिटं चालून तिचा दिनक्रम पूर्ण होतो.