कुत्र्यापासून नेहमीच सावधान रहा असे बहुतांश वेळा सांगितले किंवा लिहिलेले असते. कारण कुत्रे अनोखळी माणसांवर धाव घेत त्यांना जखमी करु शकतात. असाच एक प्रकार पंजाब येथे घडला आहे. क्लासवरुन घरी येणाऱ्या मुलाला पिटबुल जातीच्या कुत्र्याकडून कडकडून चावा घेतला जात असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. जवळजवळ 15 मिनिटे कुत्र्याच्या तावडीतून मुलाला सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जालंधर येथे मंगळवारी संध्याकाळच्या वेळेस लक्ष उपवन असे मुलाचे नाव असून तो सायकलवरुन क्लास सुटल्याने घरी जात होता. त्याच वेळेस लक्ष याला पिटबुल कुत्र्याने त्याच्या पायाचा कडकडून चावा घेण्यास सुरुवात केली. त्याने आरडाओरड सुरु केली असता आजूबाजूच्या लोकांनी लक्ष याला कुत्र्यापासून बाजूला करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच कुत्र्याला काठी-दांड्या किंवा लाथा मारल्या तरी त्याने लक्ष याच्या पायाचा चावा घेणे काही सोडले नाही. मात्र अखेर कसाबसा कुत्र्यापासून त्याचा बचाव करण्यात आला. या प्रकरणाचा व्हिडिओ सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे.
Tweet:
"कमजोर दिल वाले यह वीडियो न देखे"
पंजाब: ट्यूशन से लौट रहे बच्चे पर पिटबुल का हमला, लोग डंडे-पत्थरों से पीटते रहे, लेकिन कुत्ते ने बच्चे को नहीं छोड़ा, बच्चा गंभीर रूप से हुआ जख्मी, ये वीडियो जालंधर के माई हीरा गेट के पास पड़ते पुरिया मोहल्ला की बताई जा रही है। pic.twitter.com/ZaZrPcr3wF
— आदित्य तिवारी ( Aditya Tiwari ) (@adityatiwaree) January 28, 2020
पण कुत्र्याने चावा घेतल्याने लक्ष हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी लक्ष याच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे.