Did PM Narendra Modi Shave His Head, Beard and Mustache:  नरेंद्र मोदींनी आईच्या मृत्यूपश्चात विधींचा भाग म्हणून 'मुंडन' केलं? जाणून घ्या वायरल फोटो मागील सत्य
The viral image of PM Narendra Modi is fake (Photo Credits: Twitter)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मातोश्रीचं 30 डिसेंबरला निधन झालं. त्यानंतर तातडीने त्यांचे अंत्यविधी पार पाडून नरेंद्र मोदी कामाला लागल्याचं सगळ्यांनी पाहिलं. आता सोशल मीडीयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मुंडन' केल्याचा, दाढी, मिशी काढलेला फोटो वायरल होत आहे. या वायरल फोटो सोबत अनेकजण असा दावा करत आहेत की मोदींनी आईच्या उत्तरकार्यांसाठी 'मुंडन' केले आहे. हिंदू धर्मामध्ये मृत्यू पश्चात दशक्रिया विधींमध्ये 'मुंडन' केले जातं.

वायरल होत असलेल्या फोटोमध्ये हिंदी मध्ये असा मेसेज लिहला आहे की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू रीतीरिवाजांनुसार, आईसाठी मुंडन केले आहे. हे कर्मयोगी धन्य आहेत. मातोश्री हीराबेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.' नक्की वाचा: Heeraben Modi Last Rites: हीराबेन मोदी पंचत्त्वात विलीन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला मुखाग्नी (Watch Video).  

पहा वायरल फोटोज

दरम्यान वायरल होत असलेले हे फोटोज फेक आहेत. हे एडीट केलेले फोटोज आहेत. वायरल होत असलेल्या अनेक फोटोंना पीटीआय वृत्तसंस्थांचा दाखला दिलेला आहे. मोदींचा वायरल फोटो जूना आहे.  दोन्ही फोटोज मध्ये मोदींचं जॅकेट सारखंच दिसत आहे. 15 डिसेंबर 2017 चा मोदींचा हा जुना फोटो असल्याचं काही रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.