पाळलेल्या मगरीने महिलेला जिवंत खाल्याची धक्कादायक घटना इंडोनेशिया (Indonesia) येथे घडली आहे. मिनासाहा भागातील सुलावेसी बेटावर हा सर्व प्रकार घडला आहे. 44 वर्षीय महिला डेझी टूवू (Deasy Tuwo) या महिलेने अनधिकृतपणे मगर पाळली होती. ही महिला पर्ल फार्ममध्ये (pearl farm) लॅब प्रमुख होती. या लॅबमध्ये 14 फूट मगर अनधिकृतपणे ठेवण्यात आली होती.
मगरीला खायला घालताना चुकून ही महिला पिंजऱ्यात पडली असावी आणि त्यानंतर ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. डेझी यांच्या सहकारी यांना दुसऱ्या दिवशी डेझी यांचा अर्धवट मृतदेह आढळला. मगरीने डेझी यांचा हात आणि पोटाचा भाग खालला होता. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
14 फूट लांब असलेल्या या मगरीचं 'मेरी' नाव ठेवण्यात आलं होतं. या मगरीचं वजन दीड हजार पाऊंड होतं. मगरीला पिंजऱ्यातून बाहेर काढण्यासाठी सुमारे 3 तास लागले.