Tipper Truck (PC - Twitter)

उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका जीपमध्ये (Jeep) मोठं-मोठाले लाकडाचे ओंडके (Wooden Sticks) दिसत आहेत. हे ओडके खाली उतरवण्यासाठी दोन जणांनी चक्क जीप हातांनी उलटा केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ पाहून हा निव्वळ वेडेपणा असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी या व्हिडिओतील जुगाड पाहून म्हटलं आहे की, 'आज हा व्हिडिओ सहज मिळाला. या लोकांनी सर्वात स्वस्त ट्रिपर ट्रक तयार केला. हा वेडेपणा आहे. परंतु, हे सुरक्षेच्या आणि क्षमतेच्या नियंमाचे उल्लंघन आहे. ज्या लोकांना हा जीप हातात पकडला आहे, त्यांच्यासाठी हे नुकसानकराक ठरू शकतं. कोणतंही साहित्य नसताना लोक कसं मॅनेज करतात हे पाहून मी हैराण आहे.' (हेही वाचा - जबरदस्त! स्वतःच बैलगाडी खांद्यावर घेऊन शेतीचे काम करणाऱ्या एका बैलाचा व्हिडिओ झाला व्हायरल; नेटिझन्सही म्हणाले, आत्मनिर्भर!))

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ काही तासातचं प्रचंड व्हायरल झाला आहे. एका तासात या व्हिडिओला 60 हजारपेक्षा जास्त व्यूज तसेच 4 हजारपेक्षा जास्त प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ 500 पेक्षा जास्त जणांनी रि-ट्वीट्स केला आहे. (हेही वाचा - Viral Video: कोविड-19 चा प्रार्दुभाव टाळण्यासाठी रिक्षाचालकाने आपल्या रिक्षातच बसवले वॉश बेसिन, पाहा व्हिडिओ)

या व्हिडिओवर नेटीझन्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका ट्विटर यूजझने व्हिडिओमधील तीन जणांची तुलना बाहुबलीशी केली आहे. तसचं एका युजर्सने गरज ही सर्व जुगाडची आई आहे, असं म्हटलं आहे. सध्या सोशल मीडियावर हा जुगाड व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.