जबरदस्त! स्वतःच बैलगाडी खांद्यावर घेऊन शेतीचे काम करणाऱ्या एका बैलाचा व्हिडिओ झाला व्हायरल; नेटिझन्सही म्हणाले, आत्मनिर्भर!
Bull viral video (Photo Credits: Video Grab)

शेतातील कामांसाठी  तंत्रज्ञान व यांत्रिक उपकरणे विकसित केली गेली आहेत. मात्र, अजूनही काही शेतकरी शेत नांगरण्यापासून तर, धान्य वाहण्यापर्यंत बैलावर अवलंबून असतात. पश्चिम दिल्लीचे खासदार प्रवेश साहिब सिंह (Parvesh Sahib Singh) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एका बैलाचा व्हिडिओ (Viral Videos) शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी Mesmerising असेही कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओला 90 हजारांपेक्षाही अधिक लोकांनी पाहिले गेले आहे. या व्हिडिओत एक बैल स्वतःच बैलगाडी आपल्या खांद्यावर घेऊन शेतीचे काम करताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, बैलगाडी पुढे घेऊन जात असताना या बैलाला त्याच्या मालकाचीही गरज भासत नसल्याचे दिसत आहे. ज्यामुळे नेटिझन्सने या व्हिडिओला आत्मनिर्भर या शब्दात कमेंट केल्या आहेत.

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्राण्यांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केली जात असतात. त्यापैकी काही व्हिडिओला मोठी पसंती मिळते. नुकताच ट्विटरवर एका बैलाचा अप्रतिम व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात एक बैल आपल्या मालकाची मदत न घेता स्वतःच बैलगाडी खांद्यावर पुढे जात आहे. हीच या बैलाची खासियत आहे. त्यामुळे अनेकांना हा व्हिडिओ पसंत येत आहे. सोशल मीडियावर पहिल्यांदाच असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे देखील वाचा- Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंह राजपूत च्या आठवणीत त्याच्या पेट डॉग फज चे सुद्धा निधन? जाणून घ्या 'या' व्हायरल पोस्टचं Fact Check

ट्विट-

ट्विट-

ट्विट-

व्हॉट्सऍप, फेसबूक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियाच्या अनेकजण नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतात. ज्यामुळे सोशल मीडिया हे प्रत्येकासाठी महत्वाचे प्लॅटफॉर्म ठरत चालले आहे. तसेच सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्येही मोठी वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.