ब्रेन ट्युमरसारख्या (Brain Tumour) नाजूक आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेदरम्यान रूग्ण स्वतः शस्त्रक्रियेदरम्यान तीन तास हनुमान चालीसाचं (Hanuman Chalisa) पठण करत असल्याची एक अजब गोष्ट समोर आली. राजस्थानमधील 30 वर्षीय हुलास मललावर 'Awake Craniotomy' प्रकारच्या शस्त्रक्रियेदरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केली आहे.
'Awake Craniotomy' म्हणजे काय ?
हुलास मलला या तरूणाला ग्रेड 2 ट्युमरचं( Grade 2 Brain Tumor) निदान करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी जयपूरच्या नारायणा रुग्णालायात ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेताला. मात्र हे ऑपरेशन अतिशय धोकादायक होतं. हुलासच्या मेंदूत वाढणार्या ट्युमरची जागा अशी होती की या भागात जरासा जरी धक्का लागला असता तरी हुलासची वाचा जाण्याची किंवा शरीराचा भाग लुळा पडण्याची शक्यता होती.
हुलासवर नारायणा रूग्णालयात 'Awake Craniotomy'पद्धतीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान केवळ ज्या भागावर शस्त्रक्रिया होईल त्याच भागाला भूल देऊन सुन्न केले जाते. त्यामुळेच शस्त्रक्रियेदरम्यान हुलास भगावन हनुमानाची आराधना करत होता. त्याने तीन चालणार्या किचकट शस्त्रक्रियेदरम्यान हनुमान चालिसाचं पठण केलं, डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. शस्त्रक्रियेदरम्यान रूग्णाची वाचा तर जात नाही ना? यावर लक्ष ठेवण्यासाठी हा पर्याय डॉक्टरांनी निवडला होता. दरम्यान रूग्णाला गाणं गाणं, एखादा मंत्र पठण याची मुभा देण्यात आली होती.
डॉक्टरांची मेहनत आणि हुलासाच्या हनुमान चालिसा पठणाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हुलासावर अखेर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. हुलासाप्रमाणेच यापुर्वी शस्त्रक्रियेदरम्यान काहीजण गिटार, सेक्सोफोन वाजवताना, गातानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.