Nostradamus Predictions for New Year 2023:नागरी अशांततापासून ते तिसऱ्या महायुद्धापर्यंत, 2023 साठी नॉस्ट्रॅडॅमसचे 5 भविष्यवाण्या, आत्ता पर्यंत अनेक भाकीत ठरले खरे
Nostradamus (Photo Credit- Wikimedia Commons)

Nostradamus Predictions for New Year 2023: नॉस्ट्रॅडॅमस यांचा जन्म, दक्षिण फ्रान्स येथे 14 डिसेंबर 1503 रोजी झाला होता आणि ते प्रसिद्ध फ्रेंच चिकित्सक, कॅबलिस्ट आणि फार्मासिस्ट होते नॉस्ट्रॅडॅमस यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. अॅडॉल्फ हिटलरचा सत्तेचा उदय आणि दुसरे महायुद्ध यासारखे त्याचे अनेक भाकीत खरे ठरले आहेत.  नॉस्ट्रॅडॅमसने 6338 भविष्यवाण्या लिहिल्या, ज्यापैकी बरेच खरे ठरले. त्यांनी 3797 सालापर्यंतची भविष्यवाणी केली आहे. त्याच्या भविष्यवाण्यांचे रहस्य आजपर्यंत कोणालाही कळलेले नाही. नॉस्ट्रॅडॅमसचे क्वाट्रेन जगाला चकित करतात जरी ते जवळजवळ पाच शतकांपूर्वी लिहिले गेले होते. त्याचे 70% पेक्षा जास्त अंदाज आतापर्यंत खरे ठरले आहेत. दरम्यान बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की, नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी भूतकाळात खरी ठरली होती. आणि काहींनी असा दावा केला आहे की, त्यांनी लिहिलेल्या  भविष्यवाण्यांमध्ये 9/11 च्या हल्ल्यांसारख्या घटनांचा अंदाज होता. कोरोनाव्हायरस आजारासंबंधीचा अचूक अंदाज वर्तविण्याचे श्रेय अनेकजण नॉस्ट्रॅडॅमसला देतात... चला तर मग 2023 साठी नॉस्ट्रॅडॅमस यांनी काय भाकीत लिहून ठेवले आहेत, जाणून घेऊया 

2023 साठी केलेल्या नॉस्ट्रॅडॅमसच्या काही भविष्यवाण्या येथे पाहा:

आर्थिक आपत्तीमुळे माणूस आपल्या सहकारी माणसाला खाईल

"गव्हाचे बुशेल इतके उंच वाढेल, तो माणूस आपल्या सहकारी माणसाला खाईल". या अंदाजाचा अर्थ असा आहे की वाढत्या राहणीमानाच्या खर्चामुळे आर्थिक मंदीमुळे निराशा आणि असंतोष निर्माण होऊ शकतो.

महायुद्ध 

काही अंदाजांपैकी हे एक आहे की, तिसऱ्या महायुद्धाची शक्यता, रशिया-युक्रेन यांच्यातील सध्याचा संघर्ष पाहिल्यानंतर अनेक तत्त्ववेत्त्यांनी याला तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता म्हणून संबोधले आहे.

अग्नि संदेष्टा 

मंगळावर वसाहत करण्याचा मनुष्याचा शोध पुढील बारा महिन्यांत थांबेल. तसेच नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीत लिहिले आहे की,  "रॉयल इमारतीवर खगोलीय आग" म्हणजे याचा अर्थ असा आहे की, सभ्यतेच्या राखेतून एक नवीन जागतिक व्यवस्था उदयास येईल. नॉस्ट्रॅडॅमसच्या अनुयायांचा असा विश्वास आहे की याचा संदर्भ "काळाचा शेवट" किंवा नवीन जागतिक व्यवस्थेची सुरुवात असू शकतो. 

नागरी अशांतता

पुढे असे भाकीत केले आहे की " तुम्हाला पुढे मोठे बदल, भयानकता आणि सूड दिसतील. हे भाकीत असे सूचित करते की लोक घसरत चाललेल्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात लढा देत असल्याने श्रीमंतांविरुद्ध उठाव होऊ शकतो.

 दोन महान शक्ती एकत्र

नॉस्ट्रॅडॅमसने दोन महान शक्तींची एकत्र नवीन युती बनवण्याबद्दल मनोरंजकपणे सांगितले आहे. नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीत, ही युती एक मजबूत पुरुष आणि कमकुवत पुरुष किंवा महिला नेत्यामध्ये असेल. त्याचे परिणाम चांगले होतील, पण ते फार काळ टिकणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.