Alien पृथ्वीवर येऊन गेले असू शकतात - NASA च्या वैज्ञानिकाचा दावा
Alien पृथ्वीवर येऊ गेले असू शकतात – NASA च्या वैज्ञानिकाचा दावा | प्रतीकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

एलियन्सबद्दल (Alien) आपल्या साऱ्यांनाच कमालीची उत्सुकता आहे. अनेकदा चित्रपटाच्या माध्यमातून या विषयावर प्रकाश टाकण्यात आला असला तरीही रुपेरी पडदा आणि वास्तविक जीवन यामध्ये फरक आहे. त्यामुळे नासाच्या (NASA) शास्त्रज्ञाने केलेल्या दाव्यानुसार कदाचित एलियन्स पृथ्वीवर येऊन गेले असावेत. परंतु आपल्या कल्पनेतला आणि वास्तवातला एलियन वेगळा असल्याने मानवाला ते समजलेच नसावे.

नासाच्या रिसर्च सेंटरमधील संगणक वैज्ञानिक सिल्वानो.पी.कोलंबो (Silvano P. Colombano) यांनी आपल्या संशोधन अहवालात एलियन्स पृथ्वीवर येऊन गेल्याचं म्हटलं आहे. आपल्याला वाटतात तसे एलियन्स कार्बन बेस्ड असतीलच असे नाही. किंवा त्यांनी तसच असायला पाहिजे असे आवश्यक देखील नाही. असा खुलासा त्यांनी अहवालामध्ये केला आहे. एलियन्स आपल्यापेक्षाही हुशार असू शकतात. आकाराने अतिसूक्ष्म असू शकतात असे सिल्व्हानो यांनी अहवालामध्ये लिहलं आहे.

एलियन्स आपल्यापेक्षा अत्यंत हुशार आणि कुशाग्र असू शकतात. त्यांच्याकडे काही अद्भुत शक्ती असू शकतात. त्यांचा अंतरिक्षेमधील प्रवास आपल्यापेक्षा प्रगत असू शकतो. त्यामुळे आता आपल्याला विचारांच्या कक्षा रुंदावायला हव्यात. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये नासाच्या ' डीकोडिंग एलियन इंटेलिजेंस' या वर्कशॉपमध्ये बोलताना त्यांनी माहिती दिली.