मुंबई मध्ये पीएमसी बॅंक (PMC Bank) घोटाळ्यात पैसे अडलेल्या ग्राहकांसाठी सध्या सोशल मीडियामध्ये काही पोस्ट व्हायरल होत आहेत. यामध्ये आज (23 सप्टेंबर) दिवशी काही पीएमसी बॅंकेच्या खातेदारांना एकत्र जमून आंदोलन करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे अशी फेसबूक पोस्ट व्हायरल होत आहे. मात्र मुंबई पोलिसांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. मुंबईमध्ये कोरोनाचं संकट (Coronavirus) गडद असताना नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचे आहे. त्यासाठी मुंबईमध्ये कलम 144 वाढवण्यात देखील आले आहे. मात्र अशा परिस्थितीमध्येही काही व्यक्तींकडून आंदोलनाची वेळ आणि पत्ता सह काही पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. दरम्यान मुंबई पोलिसांनी त्यांच्याकडून अशाप्रकारे कोणत्याही आंदोलनाला परवानगी दिली नसल्याचे ट्वीटर वरून सांगितले आहे.
दरम्यान फेसबूक पोस्ट मध्ये 'मुंबई पोलिसांचा आपल्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे 23 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता चर्चगेट मध्ये आरबीआय फोर्ट परिसरात एशियाटिक लायब्ररी जवळ पोहचा' असं आवाहन करण्यात आलं आहे.
फेसबूक पोस्ट
मुंबई पोलिसांचं आवाहन
Repeating Again.
The Fact.
No permission has been granted for any such mass gatherings. Safety against corona is also amongst our pursuit of safety for Mumbaikars. Kindly do not believe in such rumours nor forward it any further #FactCheck #StayHomeStaySafe #PhysicalDistancing pic.twitter.com/M6nCcTLP2v
— Mumbai Police (@MumbaiPolice) September 22, 2020
मुंबई पोलिसांनी पीएमसी ग्राहकांना आवाहन केलं आहे की सध्या कोरोना संकटात नागरिकांनी घरामध्येच सुरक्षित राहावे. तर नेटकर्यांनीही मुंबई पोलिसांनी खोट्या बातम्या पसरवणार्या व्यक्तींवर योग्य वेळी कारवाई करावी असं आवाहन ट्वीटसला रिप्लाय देताना केलं आहे.