DJ Snake (संग्रहित संपादित प्रतिमा)

शनिवारी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे डीजे स्नेकच्या (DJ Snake) कॉन्सर्टदरम्यान अज्ञात व्यक्तींनी 40 हून अधिक हाय-एंड मोबाइल फोन चोरले. शनिवारी रात्री एमएमआरडीए मैदानावर झालेल्या या मैफिलीदरम्यान अनेक लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली की त्यांचे मोबाइल फोन हरवले किंवा चोरीला गेले आहेत. बीकेसी पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

नुकताच डीजे स्नेकचा कॉन्सर्ट मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. यासाठी शेकडो लोकांनी ऑनलाईन तिकिटे बुक केली होती. कार्यक्रमासाठी संपूर्ण मैदान खचाखच भरले होते, अशावेळी चोरांनी फोन्सवर डल्ला मारला. पोलिसांनी 40 हून अधिक मोबाइल फोन चोरीला गेल्यानंतर किंवा घटनास्थळी हरवले गेल्यानंतर कलम 379 (चोरीची शिक्षा) आणि भारतीय दंड संहितेच्या (IPC) इतर संबंधित तरतुदींनुसार चार ते पाच एफआयआर नोंदवले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

काही वापरकर्त्यांनी ट्विटरवर कॉन्सर्टमध्ये त्यांचे मोबाईल हरवल्याची तक्रार केली होती. आता आरोपींना ओळखण्यासाठी आणि पकडण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असल्याचे त्यांनी सांगितले. डीजे स्नेकचा मुंबई कॉन्सर्ट हा हिटमेकरच्या सनबर्न अरेनाच्या भारत दौऱ्याचा एक भाग होता. अहमदाबाद, दिल्ली, पुणे आणि हैदराबादसह इतर शहरांमध्येही हा संगीत कार्यक्रम झाला. आता तो आज बेंगळुरूमध्ये होणार आहे. डीजे स्नेकने यापूर्वी सांगितले होते की, त्याचा भारत दौरा या वर्षातील सर्वात मोठा हायलाइट आहे. (हेही वाचा: Nashik Robbery: नाशकात दरोडेखोरांची दहशत, दरोड्यात मौल्यवान ऐवज लंपास करत 65 वर्षीय वृध्दाची हत्या)

दरम्यान, विल्यम सामी एटिएन ग्रिगाहसिन (William Sami Étienne Grigahcine) हा एक फ्रेंच संगीत निर्माता आणि डीजे आहे. त्याचा जन्म 13 जून 1986 रोजी झाला. तो सध्या डीजे स्नेक या स्टेज नावानेओळखला जातो. डीजे स्नेकने 2013 मध्ये ‘टर्न डाउन फॉर व्हॉट’ नावाचा एक इन्स्ट्रुमेंटेशन-ओरिएंटेड सिंगल रिलीझ केला होता. त्यानंतर त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली.