Fact Check: नातवाच्या स्वागतासाठी कोविड-19 चे नियम धाब्यावर बसवत Mukesh Ambani यांनी आयोजित केली पार्टी? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य
An video of party hosted by Mukesh Ambani is going viral claiming COVID-19 protocols were violated (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरस संकटकाळात (Coronavirus Pandemic) अनेक जूने फोटोज आणि व्हि़डिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे यापूर्वी अनेकदा आपल्या निर्दशनास आले आहेत. यामुळे चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवली जाते. अलिकडेच रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुंबईतील घरातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान, सोशल डिस्टसिंग सह कोविड-19 च्या इतर नियमांचे उल्लंघन करत श्लोका (Shloka) आणि आकाश अंबानी (Akash Ambani) यांच्या मुलाच्या स्वागतासाठी ही पार्टी आयोजित केल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, आमिर खान यांच्यासह अनेक मान्यवर दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून शेअर होत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि युके मध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकराचा धोका टाळण्यासाठी पुन्हा एकदा राज्यातील पालिका हद्दीत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, व्हायरल होणाऱ्या ट्विटमध्ये लिहिण्यात आले की, नातवाच्या स्वागतासाठी मुकेश अंबानी यांच्या घरी सेलिब्रेशन. त्यावरुन हे स्पष्ट होते की, कोविड-19 चा श्रीमंत आणि ग्लॅमरस व्यक्तींना संसर्ग होत नाही. यात आपले कोविड अॅम्बेसेडर AB (अमिताभ बच्चन) देखील मास्क न घालता उपस्थित आहेत. कर्फ्यू, कोविड आणि लस केवळ सामान्य लोकांसाठी आहे.

India Awakened Tweet:

श्लोका आणि आकाश यांना 10 डिसेंबर रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्याच्या स्वागतासाठी ही पार्टी आयोजित केल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ 2019 च्या गणेश चतुर्थी सेलिब्रेशनचा आहे. मात्र चुकीच्या अर्थाने तो व्हायरल केला जात आहे.