Monkey Viral Video (Phtot Credits-Twitter)

Monkey Viral Video: सोशल मीडियात सध्या एक माकडांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये माकड ही इमारतीवरुन खाली उतरताना दिसून येत आहेत. पण उतरताना असे वाटत आहे की, त्यांना इमारतीचा पिलर जणू घसरगुंडी वाटत आहे. हे सर्व प्रकार करताना त्यांना आनंद सुद्धा होत असल्याचे या व्हिडओतून दिसून येत आहे. याचा व्हिडिओ बिझनेस टायकून हर्ष गोयनका द्वारे शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडिओला कॅप्शन दिले की, आयुष्यात ज्या सरळ गोष्टी आहेत ज्या तुम्ही पाहता आणि तुमचा दिवस आनंदी बनवतात. या व्हिडिओत असे दिसते की, दोन माकडांनी आपले पाय भिंतीला घट्ट धरुन खाली उतरत आहेत. व्हिडिओचा युजर्सच्या खुप पसंदीस पडला असून त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

गोयनका यांनी शेअर केलेल्या व्हिडिओला 1 लाखांहून अधिक वेळा लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओला 6 हजार लाइक्स आणि 660 रिट्विट केले आहे. या 10 सेकंदाच्या व्हिडिओला IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी सुद्धा आपल्या ट्विटर अकाउंटवर कॅप्शन देत शेअर केला आहे.(व्हेल माशाने माणसाला जीवंत गिळले, 40 सेकंदानंतर उलटी करुन काढले बाहेर)

Tweet:

याआधी एका माकडाचा दिल्लीतील मेट्रोमध्ये प्रवास करत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये माकड मेट्रो ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या आजूबाजूला फिरताना दिसून येत होता.