राज ठाकरे विरोधात अर्वाच्च्य भाषेत लिखाण करणार्‍या विजय वारे यांना मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप
MNS Workers VS Vijay Ware (Photo Credits: You Tube)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वर्धापन सोहळ्यात यंदा राज ठाकरेंनी 'ट्रोलर्स'ना अद्दल घडवा असा मनसैनिकांना आदेश दिल्यानंतर काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंबद्दल (Raj Thackeray) व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) वर अर्वाच्च्य भाषेत लिखाण करणार्‍या विजय वारे (Vijay Vare) या घाटकोपर स्थित व्यक्तीला मनसैनिकांनी त्यांच्या स्टाईलमध्ये चोपलं. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.

मनसैनिकांकडून चोप

घाटकोपर परिसरात राहणाऱ्या विजय वारे या व्यक्तीने व्हॉट्सअ‍ॅपवर राज ठाकरेंविरूद्ध काही आक्षेपार्ह विधानं केली. अर्वाच्य भाषेतील शेरेबाजी पाहून मनसे कार्यकर्त्यांनीही विजय वारे यांचा शोध घेऊन त्यांचं घर गाठलं. विजय वारे यांना मारहाण करत पंतनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं. मनसे कार्यकर्त्यांकडून चोप खाल्ल्यानंतर विजय वारे यांनी कबुली देत मनसे सैनिक आणि राज ठाकरेंची माफी मागितली.

सोशल मीडियामध्ये विजय वारे विरूद्ध मनसे कार्यकर्ते यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.