हैदराबादमध्ये 50 हून अधिक कोरोनाग्रस्त मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार: व्हायरल व्हिडिओ पाहून विरोधकांची सरकारवर टिका; पहा व्हिडिओ
Mass cremation of more than 50 corona patient (PC _Twitter)

भारतात कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्या सोशल मीडियावर 50 हून अधिक कोरोना रुग्णांच्या सामूहिक अत्यसंस्काराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हैदराबादमधील (Hyderabad) आहे. हा व्हिडिओ पाहून नेटीझन्सनी संताप व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावरील हा व्हिडिओ पाहून तेलंगणातील विरोधकांनी सरकारवर टिका केली आहे. तसेच सरकार कोरोना रुग्णांची आकडेवारी लपवून ठेवतं आहे, असंदेखील म्हटलं आहे. (हेही वाचा - Shantabai Pawar Viral Video: पुणे मध्ये अर्थाजनासाठी लाठी-काठींची कसरत करणार्‍या शांताबाई पवार यांचा व्हिडिओ सोशल मीडीयात व्हायरल; अभिनेता रितेश देशमुख सह मदतीसाठी पुढे आले अनेक हात!)

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर हैदराबाद येथील आरोग्य अधिकाऱ्यांकडून कोरोना मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, आरोग्य विभागाकडून कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी लपवण्यात आली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तेलंगणामध्ये 50 हजार पेक्षा जास्त नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तसेच राज्यात 447 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.