मणिकर्णिका कंगना रणावत Photo Credits Twitter

‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’हा राणी लक्ष्मीबाईच्या आयुष्यावरील चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रीलिज करण्यात आला आहे. डोळे दिपवणारा विएफएक्स इफेक्ट्स, कंगणा रणावतचा युद्धभूमीवरील रौद्ररूपातील वावर यामुळे अवघ्या काही क्षणातच मणिकर्णिकाचा टीझर प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतो.

मणिकर्णिकाचा टीझर रसिकांच्या पसंतीला उतरला असला तरीही या चित्रपटातील कंगणाच्या चेहर्‍यावरील हावभावांमुळे काही मिम्स सोशलमीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. कंगणाच्या चेहर्‍यावरील हावभावांच्या जोडीने मणिकर्णिका हा सिनेमा बॉक्सॉफिसवर अभिनेता ऋतिक रोशनच्या 'सुपर 30'ला टक्कर देणार आहे. त्यामुळे कंगणा-ऋतिकमधील कोल्ड वॉर आता बॉक्सऑफिवरही धडकणार आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी क्रिएटीव्हिटी वापरून काही खास फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

कंगना रणावतचा हा सिनेमा २५ जानेवारी २०१९ ला रीलिज होणार आहे. या सिनेमासाठी कंगणाने घोडेस्वारी, तलवारबाजीचं प्रशिक्षण घेतलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिश यांनी केले आहे. कंगनासोबतच जिशू सेनगुप्ता, सुरेश ओबेरॉय, डॅनी डॅन्झोप्पा, अतुल कुलकर्णी, अंकिता लोखंडे आणि झीशान अयुब,वैभव तत्त्ववादी आदि कलाकारांचा समावेश आहे.