शेजारच्यांकडून मुलीला त्रास होतोय यासाठी एक महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेली. पण सारी हकीकत ऐकून पोलीसदेखील काही काळ आवाक झाले. कारण ही तक्रार चक्क एका 'कोंबडी' विरोधात होती. मात्र पोलीस स्टेशनमध्ये खरा Drama तर त्यानंतर सुरु झाला आहे. कारण ज्यांची कोंबडी आहे तिच्या मालकीणीने 'कोंबडी' ला नाही तर मलाच अटक करा असं म्हटल्याने पोलिसही बुचकळ्यात पडले होते.
मध्य प्रदेश येथील शिवपुरी येथील ही घटना आहे. पूनम कुशवाला या महिलेने पोलिसात शेजाऱ्यांच्या कोंबडीची तक्रार केली. या तक्रारीमध्ये सातत्याने पूनमच्या मुलीला कोंबडी टोच मारते अशी तक्रार केली होती. कोंबडीच्या मालक आणि मालकीणीला पोलिसांनी बोलावून घेतले. तक्रारींबद्दल विचारले तेव्हा या त्रासाची कबुली देत त्यांनी कोंबडीला अटक करण्याऐवजी मालकीणीने स्वतःला अटक करा अशी पोलिसांकडे मागणी केली.
कोंबडीच्या मालक दांपंत्याला मूलबाळ नाही. त्यामुळे ही कोंबडी त्यांना अपत्याप्रमाणे प्रिय आहे. असे पोलिसांना त्यांनी सांगितले. भविष्यात शेजारच्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं त्यांनी पोलिसांना आणि पूनम कुशावाला यांना सांगितलं आहे.