प्री वेडिंग फोटोशूट दरम्यान Kiss करताना कपल नदीत पडलं (Viral Video)
Kerala couple falls into river during photoshoot (Photo Credits: Weddplanner Wedding Studio Facebook)

आजकाल प्री वेडिंग शूटची चांगलीच क्रेझ आहे. हे शूट हटके करण्यासाठी वेगवेगळ्या आयडियाज वापरल्या जातात. तरुणाई देखील नव्या भन्नाट आयडियाज वापरण्यासाठी तयार असते. असेच हटके फोटोशूट करतानाचा केरळमधील एका कपलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

प्री वेडिंग फोटोशूटसाठी हे कपल होडीत बसले होते. कॅन्डीड फोटो कॅप्चर करण्यासाठी फोटोग्राफर देखील अगदी उत्साहाने सूचना देत होता. पाण्यात उतरुन दोन-तीन माणसे कपलच्या अंगावर पाणी उडवत होती. सर्व काही रेडी असताना किस करायला जाणार इतक्याच होडी कलंडते आणि कपल पाण्यात पडतं. हा मजेशीर व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हे फोटोशूट पठानमथिट्टा (Pathanamthitta) जिल्ह्यातील कदममनीट्टा (Kadammanitta) मधील पम्बा (Pamba) नदीच्या किनारी सुरु होते. सर्व काही सेट असताना झालेल्या फजितीवर कपल आणि फोटोग्राफर दोघेही खळखळून हसताना दिसले. या व्हिडिओला फेसबुक 1.5 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. हा व्हिडिओ इतका व्हायरल होईल, असे त्यांना वाटले देखील नव्हते.

कपलचे प्री वेडिंग फोटोज:

पहा व्हिडिओ:

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फोटोग्राफी स्टुडिओ वेडप्लॅनर बिन्सी निर्मलन यांनी सांगितले की, "सुरुवातीला शूट करणाऱ्या कपलला देखील माहित नव्हतं की हा प्लॅन आहे. मात्र त्यांना कळल्यानंतर त्यांना देखील हसू आवरले नाही. त्यांनी देखील ही फजिती खूप एन्जॉय केली. आमच्या टीमचा हा पूर्वनियोजित प्लॅन होता. व्हिडिओ पाहणाऱ्या अनेकांना ही अचानक घडलेली घटना वाटते. मात्र आमच्या टीमचे तसे नियोजन होते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण आमच्या पर्सनल वेबसाईटवरुन मजेशीर शूट करु इच्छितात. तसंच नार्मल शूटच्या देखील अनेक ऑफर्स आम्हांला मिळत आहेत."

व्हिडिओद्वारे मिळणारी प्रसिद्धी कपल, त्यांचे कुटुंब आणि वेडिंग कंपनी अगदी मनापासून एन्जॉय करत आहेत. थिरुवल्ला (Thiruvalla) येथील तिजीन थॅकेचेन (Tijin Thankachen) आणि चंगनाचेरी (Changanacherry) ची सिल्पा (Silpa) या दोघांचे हे फोटोशूट होते. 6 मे रोजी हे कपल विवाहबंधनात अडकणार आहे.