#JusticeForChutki is Trending on Twitter: सध्या भारतावर कोरोना विषाणूचे (Coronavirus) संकट आले आहे. दुसरीकडे नुकतेच महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावरून निसर्ग चक्रीवादळाने (Cyclone Nisarga) मार्गक्रमण केले. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, उद्योग बंद होत आहेत. अशात अनेक बाबतीत जनतेमध्ये घबराटीचे वातावरण आहे. मात्र या वाढत्या ताणतणावाच्या काळात सध्या #JusticeForChutki हा ट्विटरवरील टॉप ट्रेंडपैकी एक बनला आहे. होय, यावरून सध्याच्या परिस्थितीमध्ये जनतेला कोणत्या गोष्टीची जास्त चिंता आहे हे दिसून येते. इतकेच नाही तर बघता बघता हा हॅशटॅग व्हायरल झाला आहे. छोटा भीम (Chhota Bheem) हे एक प्रसिद्ध कारटून आहे. यामध्ये भीमने चुटकी (Chutki) ऐवजी ढोलकपूरच्या राजकुमारीशी इंदुमतीशी (Rajkumari Indumati) लग्न केल्याने 'चुटकीसाठी न्याय' हा ट्रेंड सुरु झाला आहे.
याबाबत ट्विटरवर अनेक मजेदार मीम्स बनवले जात आहेत. यामधून छोटा भीमचे लग्न चुटकीशी न होता इंदुमतीशी झाले, याबाबत निराशा व्यक्त केली जात आहे. छोटा भीम व चुटकी हे ‘एकमेकांसाठीच बनलेले' आहेत यावर नेटिझन्सचा दृढ विश्वास आहे.
पहा मीम्स -
Why makers why have u done this?
Bheem nd chutki made for each other.. Bheem can't marry indumati
The way chutki care nd love bheem.. She deserves same in return#Bhutki is couple goals ♥ #JusticeForChutki pic.twitter.com/XtK0To3q4N
— KK❤ (@_Happy_soul__) June 3, 2020
Wat is this behaviour bheem ? pic.twitter.com/qF35ktua5s
— Amrita✨ (@khayaliipulav) June 3, 2020
Chutki deserves a saccha ashiq like Nobita
Now i ship #NoTki pic.twitter.com/8irqfzaRFv
— Doru ki Deewani 🤩 (@ArpaCasm) June 3, 2020
Me to People Who are Trending#JusticeForChutki : pic.twitter.com/nFNPhOmebE
— #PetlaParaak (@HarshaTweetz) June 3, 2020
Bheem played with chutki's emotions & conveniently married indumati in the end.
What were u doing the whole time wid chutki?
Celebrating Christmas?
Ate her laddoos, made her fight wid her own mom, made her risk her own life for u so many times!
Chose money?#JusticeForChutki pic.twitter.com/XnX4KEn5Ys
— Team Rashami Desai (@PsychologistAsd) June 3, 2020
People after seeing this trend!!
It's time to leave this planet 😂 #JusticeForChutki pic.twitter.com/ZPRCksgkjG
— ▪️ᴘᴀʀᴅᴇᴇᴘ ▪️ (@SanaMyLadyluck) June 3, 2020
Why Bheem why...?? 😣😣😢😢#JusticeForChutki pic.twitter.com/Xxd4OMzLMV
— Sídhαrth Shuklα™♥️ (@Sid_ShuklaFC) June 3, 2020
They were more than friends and that was quite clear but still bheem ne dhokaa diyaa🙂#JusticeForChutki @Khushi09667126 pic.twitter.com/hRv2TIXk2c
— Ishikaaa (@ishhhhhh06) June 3, 2020
भारतामध्ये कोरोना विषाणू लॉक डाऊन सुरु झाले, त्यामुळे सर्व मालिकांचे, चित्रपटांचे शुटींग थांबले. हीच संधी साधून या काळात अनेक जुन्या मालिकांचे पुनःप्रक्षेपण सुरु झाले. अशात मनोरंजनासाठी छोटा भीमदेखील दाखल झाला. छोटा भीम हा एक लोकप्रिय अॅनिमेटेड किड शो आहे जो मूळतः पोगो वर प्रसारित होत असे व सध्या तो दूरदर्शनवर चालू आहे. यामध्ये भीमसोबत चूटकी, राजू, जग्गु, राजकुमारी इंदुमती अशी अनेक पात्रे लोकप्रिय ठरली. (हेही वाचा: 'कुछ कुछ होता है' चित्रपटातील सीन शेअर करत नागपूर पोलिसांनी मजेशीर मीम्सद्वारे सांगितलं मास्क घालण्याचं महत्व)
तर अशाप्रकारे हे मीम्स सध्या सोशल मिडियावर भाव खाऊन जात आहेत. मात्र लक्षात घ्या छोटा भीम ही लहान मुलांसाठी असलेली अॅनिमेटेड मालिका आहे, त्यामुळे यामध्ये भीम कधीच मोठा होणार नाही. याशिवाय भारतात बालविवाह हा गुन्हा असल्याने, तो इंदुमती किंवा चुटकी किंवा कोणाबरोबरही लग्न करणार नाही. आपण याबाबत मीम्स आणि विनोद करणे सुरू ठेवू शकता, मात्र छोटा भीमचे लग्न या कार्यक्रमात होणे संभव नाही.