आरोपीवर अजब निर्बंध; सेक्स पार्टनरची माहिती 24 तास आधी न्यायालयाला देणं बंधनकारक
Representational Image | (Photo Credit : Pixabay)

लैंगिक शोषणाचा (Sexual Abuse) आरोप असणाऱ्या एका व्यक्तीला न्यायालयाने एक अजब अट घातली आहे. कोणत्याही महिलेसोबत शरीरसंबंध ठेवण्याच्या 24 तास आधी त्यासंदर्भातील माहिती पोलिसांना देण्याचे न्यायलायाने म्हटले आहे. युनायटेड किंग्डममधील (United Kingdom) ही घटना असून डीन डेअर असं या अरोपीचं नाव आहे. 39 वर्षीय डीनने यापूर्वी अनेक महिलांचे लैगिंक शोषण केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे न्यायालयाने त्याच्यावर अनेक निर्बंध लावले आहेत. आवश्यक असेल तेव्हाच महिलांशी डीनने संवाद साधावा असं न्यायालयाने म्हटलं आहे.

द मेट्रोच्या रिपोर्टनुसार, बस कंडक्टर, दुकानदार किंवा टॅक्सी चालक महिला असेल तर तिच्याशी कामापुरतं बोलण्याच्या सूचना डीनला देण्यात आला आहे. तसंच सेक्सची इच्छा झाल्यास त्याने आपल्या सेक्स पार्टनरला आणि चारिंग क्रॉस पोलीस स्थानकामध्ये यासंदर्भात 24 तास आधीच माहिती द्यावी, असे न्यायालयाने सांगितलं आहे.

डीन हा पश्चिम लंडनमधील नॉटींग हिल्स येथील रहिवासी असून तो इमारतीचे बांधकाम करणारा एक कर्मचारी आहे. त्याच्या विरोधात सात वेगवेगळ्या महिलांनी तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं. दरम्यान, त्याने यापूर्वी अनेक महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचे निर्दशनास आले आहे. तसंच 14 वर्षीय मुलीचाही गैरफायदा घेण्याचा त्याने प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीची छेड काढण्याची धमकीही त्याने दिली होती. तसंच त्याने महिलांची छेड काढल्याचे मान्य केलं आहे.

न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं असलं तरी त्याच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा न आढळल्याने त्याला कठोर शिक्षा होऊ शकलेली नाही. त्यामुळेच न्यायालयाने त्याच्यावर काही निर्बंध लादले आहेत. विशेष म्हणजे डीनची न्यायालयातील वागणूकही विचित्र होती. मोठ्याने जांभई देणे आणि आवाज काढणे यासारखे प्रकार तो करत होता.