या रेस्टॉरंट मध्ये मिळेल तुमच्या गर्लफ्रेंडसाठी एक खास मेन्यू
Couple in Restaurant (Photo Credits: PixabaY)

आपल्या गर्लफ्रेंड सोबत आपल्याला छान वेळ घालवायचा असेल तर आपण अनेकदा कोणत्या तरी छान रेस्टॉरंट मध्ये जाणे पसंत करतो. तुमची गर्लफ्रेंड तुमच्यावर नाराज असेल किंवा तुम्हाला तिचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर तुम्ही तिला तिच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाता किंवा तिला तिच्या आवडीचे पदार्थ खायला घालता. नाराज असलेल्या गर्लफ्रेंडला चांगल्या रेस्टॉरंटमध्ये नेणे हे तुमच्यासाठी एक मोठे आव्हानच असते. अशावेळी तुम्हाला असे एक रेस्टॉरंट मिळाले जिथल्या मेन्यू कार्ड मध्ये तुमच्या गर्लफ्रेंडसाठी खास मेन्यू मिळाला तर. ऐकून धक्का बसला ना, पण कदाचित हा सुखद धक्का तुम्हाला नाही तर तुमच्या गर्लफ्रेंडला मिळेल.

फिलाडेल्फियामध्ये एक असे रेस्टॉरंट आहे जिथे मेन्यू कार्डमध्ये 'माय गर्लफ्रेंड इज नॉट हंग्री' असा पर्याय ठेवला आहे. हा पर्याय तुम्हाला थोडा विचित्र वाटेल. मात्र जर तुम्ही हा पर्याय निवडला तर तुमच्या गर्लफ्रेंडला प्लेटमध्ये एक्स्ट्रा फ्रेंच फ्राइज, चिकन विंग्स आणि फ्राइड चीज स्टिक्स सारखे पदार्थ मिळतील.

एवढंच नव्हे तर या मेन्यूची किंमत ही काही जास्त नाही. येथे बरेचसे पदार्थ 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत. या रेस्टॉरन्ट मध्ये फ्राइड पिकल्स, ग्रीन बीन्स, फ्राइड स्क्वाश आणि कोल स्लॉ सारखे पर्यायही उपलब्ध आहेत.

हेही वाचा - Love Guru ज्ञान: Girlfriend सोबत Breakup टाळायचा आहे? करा हे काम

असे आगळवेगळे मेन्यू तुमच्या जवळील रेस्टॉरन्टमध्ये जोडले गेले तर तुमची गर्लफ्रेंडही तुमच्यावर खूश होईल. नाही का? त्यामुळे असे मेन्यू भारतातही यावेत अशी अपेक्षा काही हरकत नाही.