Student's Heart Diagram Goes Viral: उत्तर पत्रिकेत विद्यार्थ्याने काढली ह्रदयाची आकृती, अन् पुढं हद्दच केली पार; सोशल मीडियावर फोटो चर्चेत
Funniest Thing On Internet Today: pC TW

Student's Heart Diagram Goes Viral: विज्ञान विषयाचा पेपर सर्वांनाच अवघड जातो. कधी तर आकृतीमुळे तर कधी मोठ्या उत्तरांमुळे हा विषय विद्यार्थी वर्ग नापसंद करतात. उत्तर येत नसल्यामुळे एका विद्यार्थ्यांने चक्क हद्दच पार केली आहे. प्रश्नपत्रिकेत दिलेल्या प्रश्नाचे कोणी असं उत्तर लिहील याचा कोणालाच अंदाज नव्हता. नुकताच सोशल मीडियावर एका अकाऊंटवर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना. (हेही वाचा-उत्तराखंडमधील टिहरी येथे भरधाव कारने धडक दिल्याने तिघांचा मृत्यू, 2 जण जखमी)

उत्तर पत्रिकेत विद्यार्थ्यांने ह्रदयाची आकृती काढून त्यावर प्रत्येक ह्रदयाच्या भागावर गर्लफ्रेंडची नावे लिहली आहे. एवढेच नाही तर पुढे त्याने प्रत्येक मुलींची वैशिष्ट स्पष्टीकरणासह लिहली आहे. एका ह्रदयावर 5 मुलीची नावे लिहणारा या विद्यार्थ्याची उत्तर पत्रिका फार चर्चेत आहे. सोशल मीडियावर या अनोखळी विद्यार्थ्याची उत्तर पत्रिका व्हायरल होत आहे.

त्याने ह्रदयाच्या प्रत्येक भागांवर वेगवेगळ्या मुलींची नावे लिहली आहे. हरिता, पिया, रूपा, नमिता आणि पूजा अशी नावे लिहली आहे. केवळ नावे लिहलून तो थांबला नाही तर प्रत्येक मुलीच्या 'फंक्शन्स'चे त्याच्या हृदयात वर्णन केले आहे. व्हायरल झालेल्या फोटोला अनेकांनी कमेंट केले आहे. आज इंटरनेटवर दिसणारा सर्वात मजेदार फोटोंपैकी एक असल्याचे नेटकरी बोलत आहे.