Dehradun Reliance Jewels Showroom Loot Video: डेहराडूनमध्ये चोरट्यांनी बंदुकीच्या धाकावर लुटले करोडोंचे दागिने, Watch
Dehradun Reliance Jewels Showroom Loot (PC - Twitter)

Dehradun Reliance Jewels Showroom Loot Video: भारताच्या राष्ट्रपतींच्या राज्य दौऱ्यासाठी राज्य पोलीस यंत्रणा सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात गुंतलेली असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी उत्तराखंडमधील डेहराडून येथील रिलायन्स ज्वेलरी (Dehradun Reliance Jewels) स्टोअरमधून करोडोंचे दागिने पळवून नेले. ही घटना गुरुवारी (9 नोव्हेंबर) सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास राजापूर रोड येथील शोरूममध्ये घडली. वृत्तानुसार, शोरूममध्ये पाच लोक घुसले आणि त्यापैकी दोघांकडे शस्त्रेही होती. त्यांनी बंदुकीच्या धाकावर दुकान लुटले.

राष्ट्रपतींच्या उत्तराखंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस बंदोबस्त असताना ही दरोड्याची ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Viral Video: दिल्लीत दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने महिलेवर चाकूने हल्ला करून सोनसाखळी हिसकावली, पहा व्हिडिओ)

सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लुटमारीत सामील असलेला एक चोर दागिने पळवून नेत आहे. इतर लोक त्याला दागिने आणि मौल्यवान वस्तू पॅक करण्यात मदत करत आहेत.

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 7 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2023 या तीन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी राजभवनात राष्ट्रपतींची भेट घेतली आणि त्यांचे राज्यात स्वागत केले.