रेल्वेतच पत्नीचं गिफ्ट विसरलेल्या या मुंबईकराने 'अशी' लढवली शक्कल
मुंबई लोकल Photo Credits PTI

मध्य रेल्वे ही मुंबईची लाइफलाईन आहे. अनेकांदा गर्दी, कोलमडलेलं वेळापत्रक, रेल्वेत पीक अव्हर्स मध्ये होणारे बिघाड आणि मेगाब्लॉक अशा एक ना गोष्टींमुळे सतत तक्रारीचे सूर तुम्ही ऐकले असतील. पण सोशल मीडियावरून एका मुंबई कराच्या मदतीला धावलेले रेल्वेप्रशासन वाचून तुम्हाला आनंद होईल. गाडीत विसरलेल एक मौल्यवान गिफ्ट वेळीच प्रवाशाला कसे मिळवून दिलं हे नक्की वाचा.

काय घडला प्रसंग?

 

सागर मवाणीने पत्नी साठी काही खास गिफ्ट विकत घेतले . होते. मुंबईत तो रेल्वेने प्रवास करत होता. विद्याविहाराला ट्रेनमध्ये चढला आणि ठाकुर्ली स्टेशनला उतरला. मात्र उतरल्यावर आपण ट्रेनमध्येच गिफ्ट विसरल्याचं त्याच्या लक्षात आलं. RPF हेल्पलाइन क्रमांकावर फोन केला. पण तेथे कोणीच . फोन उचलत . नव्हत. सागरने सेंट्रल रेल्वेला ट्विटरच्या माध्यमातून सारा प्रकार सांगितला. रेल्वेच्या ट्विटर अकाउंट वरून हेल्प लाईनचा नंबर देण्यात आला. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याचं सांगताच संबंधितांपर्यंत हा संदेश पोहचवण्यात आला आणि सागरला बॅग परत मिळाली. सागराने ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे . कर्मचाऱ्यांचे आभारही मानले.