एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या तरुणीला तीन महिलांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर तरुणीने महिलांकडे त्यांच्या लसीकरणाचा पुरावा मागितल्याने त्या भडकल्या आणि तिला मारले. याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हे प्रकरण अमेरिकेतील मॅनहटन येथील असल्याचे सांगितले जात आहे. तर लसीकरण झालेल्या नागरिकांनाच हॉटेलमध्ये एन्ट्री दिली जात आहे.(Vasai Road रेल्वे स्टेशनवर चालत्या ट्रेनखाली पडण्यापासून प्रवाशांनी महिलेला वाचवले; काळजाचा ठोका चुकवणारी घटना CCTV मध्ये कैद Watch Video)
हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वारावरच तेथे काम करणारी तरुणी लोकांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासून पाहत होती. त्यानंतरच नागरिकांना आतमध्ये जाण्याची परवानगी दिली गेली. ABC न्यूज यांच्या मते, याच वेळी Carmine रेस्टॉरंटमध्ये तीन महिला आल्या. तेव्हा महिला कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे लसीकरणाचा पुरावा मागितला असता तेव्हा त्या संतप्त झाल्या. तसेच त्यांनी दोन कर्मचाऱ्यांना मारहाण सुद्धा केली.(लहान मुलीच्या गळ्याभोवती किंग कोबरा चा 2 तास वेढा नंतर चावा; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल)
Tweet:
Video shows Carmine's hostess being assaulted over NYC COVID vaccine requirement. https://t.co/mNhCnObOMJ pic.twitter.com/PbQxB84r3b
— Eyewitness News (@ABC7NY) September 17, 2021
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत तीन महिलांना ताब्यात घेतले. पीडित महिलेला दुखापत झाली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सुद्धा समोर आला असून त्यात स्पष्टपणे महिला कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसून येत आहे. तर या सर्व प्रकारात गोंधळाची स्थिती निर्माण होण्यासह महिला कर्मचाऱ्याचा बचाव करताना सुद्धा दिसून आले आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर तीन महिलांवर जोरदार टीका केली जात आहे.