Nepal Plane Crash Video (PC - Twitter/ @KazmiWajahat)

Nepal Plane Crash Video: नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ (Pokhara International Airport in Nepal) आज 72 आसनी विमान कोसळल्यानंतर भीषण आग लागली. नेपाळच्या लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तानुसार, काठमांडूला जाणारे विमान विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 20 मिनिटांत क्रॅश झाले. ही व्हिडीओ क्लिप विमान कोसळण्यापूर्वीची असल्याचा दावा करत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.

या व्हिडिओमध्ये हवेतच विमानाचा तोल सुटलेला दिसत असून नंतर मोठा आवाज होऊन ते जमिनीवर कोसळल्याचे दिसत आहे. दुसर्‍या क्लिपमध्ये क्रॅश झालेल्या विमानातून धुराचे लोट निघत असताना मोठ्या ज्वाळा दिसत आहेत. स्थानिक आणि बचाव पथकांनी प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला. न्यूज एजन्सी एएनआयने एक क्लिप शेअर केली आहे. ज्यामध्ये बचाव पथक आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. (हेही वाचा -Aircraft Crashes at Pokhara International Airport: पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 68 प्रवाशांसह विमान कोसळले)

विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. यती एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी काठमांडू पोस्टला सांगितले की, जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान ते क्रॅश झाले. स्थानिक अधिकारी गुरुदत्त ढकल यांनी सांगितले की, विमाला आग लागली होती आणि बचाव कर्मचारी ते विझवण्याचा प्रयत्न करत होते. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, विमानात पाच भारतीयांसह सुमारे 15 परदेशी नागरिक होते.