viral video PC TWITTER

Viral Video: इंटरनेटवर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात खाद्य पदार्थांचे व्हिडिओ भरपूर प्रमाणात सोशल मीडियावर येत असतात. समोसा हा लहान मोठ्यांचा आवडीचा खाद्य पदार्थ आहे. आता पर्यंत समोसा हा वाटाणा आणि बटाट्याच्या भाजीचे स्टफिंग केलेले खाल्ले आहेत. समोसा सोबत तिखट गोड चटणी असली की अजून एक समोसा खावासा वाटतो. परंतु बाजारात समोस्याचा नवा प्रकार आला आहे. हे पाहून चाहत्यांनी वेगळ्याचे प्रतिक्रिया दिल्या आहेत. समोसा खाणारे देखील प्रेमी वेगवेगळे आहेत. समोसाची पापडी खाणारे तर फक्त समोसाच्या आतील बटाट्यांची भाजी खाणारे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत चक्क बटाट्याची भाजी वगळता भेंडीची भाजीचे समोस्यात स्टफिंग केले आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एक दुकानदार समोसाची विक्री करत आहे. एक विक्रेता हा समोसा खाण्यासाठी घेतो. दुकानदार समोरा एका प्लेटमध्ये घेतो त्याचे तुकडे करतो आणि त्यानंतर त्यावर तिखट गोड चटणी आणि दोन झणझणीत मिरची आणि कोथिंबिर घालून सर्व्ह करतो. (हेही वाचा- दिल्लीतील एका प्रसिद्ध कॅफेमध्ये अस्वच्छता, डोस्यात आढळले 8 झुरळ

 

View this post on Instagram

 

A post shared by ISHANT 🧿 (@foodi_ish)

व्हिडिओला कॅप्शन दिले आहेत (viral) या एका प्लेटची किंमत प्रति प्लेट 30 रुपये असल्याची माहिती मिळतेय. समोसो टेस्टो होता असे देखील लिहले आहे. हा भेंडी समोसा दिल्लीतील चांदणी चौकमध्ये खाण्यास मिळेल असं देखील लिहले आहे. यावर अनेकांनी कंमेट केले आहे. एकाने लिहले आहे की, बघूनच उलटी येण्यासारखं होत आहे. तर एकाने विचारले आहे की, कारले का नाही?  foodi_ish नावाच्या अकाऊंटवर इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.