Happy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन
Representational Image (Photo Credits: flicker.com)

आजकाल कोणत्याही व्यक्ती, परिस्थिती किंवा अगदी सेलिब्रेटी, सिनेमे यावर मीम्स करण्याचा ट्रेंड आहे. हे मीम्स जितक्या जलद येतात तितकेच विरुनही जातात. पण मीम्स बनवण्याचा हा ट्रेंड इंटरनेटच्या अंतापर्यंत चालू राहील. पण या मीम्समागे भन्नाट क्रिएटीव्हीटी असते, याबद्दल कोणतेच दुमत नाही. दोन दिवस देशभरात होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. यावर देखील काही फनी मीम्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

होळीच्या उत्साहात सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही खास मीम्स:

 

होळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होलिका दहनानंतर धुळवडीचे वेध सर्वांना लागतात. धुळवडीत होळीच्या रंगात लहानांपासून मोठ्यापर्यंत सारेच न्हाऊन निघतात. पण काहींचे मात्र सोशल मीडियावर मीम्सच्या माध्यमातून खास सेलिब्रेशन सुरु असते.