Gujarat's BJP legislator Madhu Shrivastav. (Photo Credit: Video grab)

गुजरात (Gujarat) मधील भाजपचे आमदार मधु श्रीवास्तव (BJP MLA Madhu Shrivastav) हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे लोकप्रिय आहेत. आता यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाला लाजिरवाणे असे कृत्य केले आहे. श्रीवास्तव यांना अलीकडेच कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली होती, त्यानंतर ते त्यातून बरेही झाले. आता त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते बरे झाल्यानंतर सेफ्टी प्रोटोकॉलचे सर्व नियम धाब्यावर बसवून, वडोदराच्या गजरवडी परिसरातील गर्दी असलेल्या मंदिरात आपल्या समर्थकांसह नृत्य केले आणि भजन गायले. सध्या सोशल मिडियावर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

इंडिअन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. श्रीवास्तव यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, ज्यात हे आमदार मंदिरात भजनांच्या तालावर नाचताना दिसत आहेत आणि त्यांचे समर्थक त्यांना यामध्ये साथ देताना दिसत आहेत. या गर्दीमध्ये फक्त दोन लोक सोडून, मंदिरातील पुजारींसह कोणीही मास्क घालताना दिसत नाही.

पहा व्हिडिओ -

याबाबत बोलताना श्रीवास्तव यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, 'मी मंदिरात नाचण्याचा व्हिडिओ खरा आहे. मी दर शनिवारी इथे नृत्य करतो. मी गेली 45 वर्षे तिथे जात आहे, त्याच प्रमाणे कालही मी तिथे गेलो होतो. हे काही नवीन नाही. तसेच मी कोणत्याही मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष केले नाही, कारण सरकारने अशा मेळाव्यास परवानगी दिली आहे. त्यासंदर्भात परिपत्रकही जारी केले आहे. हा मेळावा माझा खासगी मेळावा होता आणि इथे फार कमी लोक होते.’ (हेही वाचा: आयर्लंडचे मराठी वंशाचे उप पंतप्रधान लिओ वराडकर यांच्या तोंडावर महिलेने फेकले ड्रिंक; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल)

श्रीवास्तव पुढे म्हणाले की, ‘हे मंदिर माझ्या स्वतःच्या मालकीचे आहे आणि आत मास्क घालणे गरजेचे नाही. मी कित्येक वर्षांपासून इथे स्वतः भजन गात आहे तसेच यावेळी मी केले.’ दरम्यान, श्रीवास्तव यांना ऑगस्टच्या अखेरीस कोरोना व्हायरसची लागण झाली होती. एका आठवड्यासाठी ते रुग्णालयात दाखल होते. योगायोग असा की, श्रीवास्तव यांची चाचणी पॉझिटिव्ह येण्याआधी त्यांच्या दीर्घकालीन वैयक्तिक सहाय्यकाचेही कोरोना व्हायरसने निधन झाले.