Google | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Google Tweet Viral: जगातील सर्वात मोठे सर्च इंजीन अशी ओळख असलेल्या गुगलने (Search Engine Giant Google) नुकतेच एक ट्विट केले आहे. या ट्विटमुळे ट्विटर युजर्सच्या भूवया चांगल्याच उचावल्या आहेत. ट्विटरने एक मजेशीर ट्विट करत युजर्सना प्रश्न (Twitter users a funny question) विचारला आहे की, जर तुमच्या कुत्र्याने इंटरनेट सर्च केले आणि त्याने प्रश्न विचारला तर तो काय असेल? गूगलला (Google ) या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायला आवडेल, असेही म्हटले आहे. गूगलच्या या ट्विटनंतर उत्तरादाखल अनेक मजेशीर (Funny Answers) प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

गूगलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर Google official Twitter handle) यूजर्सला म्हटले की, (Google asked users) 'जर तुमचा कुत्रा Google वापरतो तर इंटरनेटवर तो काय सर्च करेन? ' गुगलच्या या ट्विटवर अनेकांनी मजेशीर उत्तरे दिली आहेत. गुगलचे तब्बल 25.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. ज्यातील अनेकांनी मजेशीर उत्तरे दिली आहेत. काहींनी म्हटले आहे की, चांगले खाणे शोधायला त्याला आवडेल.

ट्विट

काही लोकांनी आपली प्रतिभा दाखवत म्हटले आहे की, 'प्ले ग्राऊंडमध्ये जाण्यासाठी तो उबर बुक करेन.' दुसरा एक यूजर म्हणतो की, 'तो शोधण्याचा प्रयत्न करेन की आपल्या आजूबाजूला कुकीजचे दुकान कुठे आहे.' आणखी एक यूजर म्हणतो की, 'गूगलच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटले आहे की, दुसऱ्या कुत्र्याचे खाणे कसे हिसकावता येईल. ' एखादा मेल कुत्रा आपल्या आवडीची गर्लफ्रेंडला कसे इंप्रेस कराे याबाबतही शोध घेईल. ट्विटने 22 जूनला पोस्ट केलेल्या या प्रश्नाला 2,000 पेक्षा अधिक लाईक्स आलेल्या आहेत. 150 पेक्षा अधिक लोकांनी रिट्विट केले आहे.