Photo Credit- x

Giraffe Picks Up Toddler: जंगलात सफारी दरम्यान अनेक जण वन्य प्राण्यांना त्यांच्याजवळील खाद्यपदार्थ खायला देतात. त्यादरम्यान, काहींना विचित्र घटानांना सामेर जावं लागत. मात्र, टेक्सासमधील फॉसिल रिम सफारी पार्कमध्ये (Fossil Rim Wildlife Centre) एका जिराफाने त्याला खायला देणाऱ्या 2 वर्षाच्या चिमुकल्यालाच उचलल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. चिमुकला (Toddler) त्याच्या कुटुंबासोबत कारमधून जंगल सफारी करत होता. त्या दरम्यान, त्यांच्या कारजवळ एक जिराफ (Giraffe) आला. मुलाच्या हातातील वस्तू जिराफाने खायचा प्रयत्न केला. मात्र, ती वस्तू उचलताना जिराफाच्या तोंडात चिमुकल्याचा हात देखील फसला. त्यामुळे चिमुकला अलगद उचलला गेला. मात्र, जिराफाने नंतर चिमुकल्याचा हात तोंडातून काढून टाकला. (हेही वाचा:Viral Octopus Video: पाण्याच्या आत ऑक्टोपस सरड्या प्रमाणे वेगाने रंग बदलताना दिसला. व्हिडिओ पाहून तुम्ही ही थक्क व्हाल)

पोस्ट पाहा-

दरम्यान, जिराफ हा शांत प्राणी म्हणून ओळखला जातो. तो कधीही माणसांना इजा करत नाही.  त्याच्या उंच मानेमुळे अनेकांना जिराफ फार आवडतो. जिराफाच्या हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.