Ghaziabad Dog Attack : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये पाळीव कुत्र्यांची दहशत वाढली आहे. यावेळी गाझियाबाद येथील अजनारा इंटिग्रिटी सोसायटीमध्ये जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याने 6 वर्षीय मुलीवर हल्ला केला आहे. पाळीव कुत्र्याने मुलगी जेव्हा सोसायटीच्या आवारात सायकल चालवत होती. त्याचवेळी हल्ला करून तिच्या मनगटावर चावा घेतला. त्यामुळे ती जखमी झाली. एका मुलीवर कुत्र्याने हल्ला केल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ही तरुणी सोसायटीत सायकल चालवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, एक महिला आपल्या पाळीव जर्मन शेफर्डला सोसायटीत फिरत होती. अचानक कुत्र्याने मुलीवर हल्ला करून तिच्या मनगटाला चावा घेऊन जखमी केले.
मात्र, जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याने मुलीवर हल्ला केला आहे. पण त्याला फिरवत असलेल्या महिलेने तिला बळजबरीने स्वतःकडे ओढले. त्यामुळे या मुलीचा या कुत्र्यापासून बचाव झाला. मुलीला कुत्रा चावल्यानंतर पीडित मुलीच्या आईने स्थानिक पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.