हिंदू पंचांगानुसार प्रत्येक दिवस आणि प्रत्येक आमावस्या, पौर्णिमा वेगवेगळ्या कारणाने महत्त्वाची असते. पण या सगळ्यात अनेकांच्या उत्सुकतेचा विषय असतो तो म्हणजे गटारी अमावस्या (Gatari Amavasya 2022). काही लोक तर गटारी आमावस्या येण्याची वर्षभर वाट पाहात असतात. धार्मीक अर्थाने या आमावस्येचे महत्त्व आगळेवेगळे असले तरी, अनेकांच्या दृष्टीने हा खास वेगळाच दिवस असतो. गटारी आमावस्या म्हणजे खास मांसाहार (Non-Vegetarian) करणाऱ्यांचा दारु, अंडी आणि मटन साजरा करण्याचा खास दिवस. 'होऊ दे पार्टी', असाच काहीसा हा दिवस असतो. सोशल मीडियावरही गटारी आमावस्याचे अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत. यात बराक ओबामा (Barack Obama) यांच्या पासून ते अलिया भटपर्यंत अनेकांचे मिम्स तयार करुन नेटीझन्सनी सोशल मीडियावर गटारी साजरी करण्यास सुरुवात केली आहे. पाहा हे खास मजेदार मिम्स.
हिंदू परंपरेत सांगितल्यानुसार, श्रवण महिन्यात मांसाहार वर्ज्य असतो. अशा वेळी आषाढ महिना संपण्यापूर्वी श्रावण पाळणारे लोक मांसाहार करणारे लोक अंडी, मटन खाऊन घेतात. हा दिवस म्हणजेच गटारी आमावस्या. श्रावन महिन्याच्या पहिल्या दिवसापूर्वी जो दिवस येतो म्हणजेच श्रावण महिन्याची सुरुवात होण्यापूर्वी आगोदरचा एक दिवस असतो तो म्हणजे गटारी. विशेष म्हणजे या दिवशी आमावस्या येत असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व असते. त्यातूनच गटारी आमावस्या हा शब्द रुढ झाला असावा असे अभ्यासक सांगतात. (हेही वाचा,Gatari 2022 Special Non-veg Recipes: गटारीसाठी स्पेशल 5 अस्सल महाराष्ट्रीयन मांसाहारी पदार्थ, व्हिडीओ पाहून तोंडाला सुटेल पाणी, पाहा व्हिडीओ )
बराक ओबामा कोल्हापूरचे
बराक ओबामा मूळचे कोल्हापूरचे? काय आहे गंमत नक्की व्हिडिओ पाहा, जाम भारी हाय 😃🤣😁😂#कोल्हापूर @Aapalkolhapur @majhKolhapur pic.twitter.com/lzwtbTzLak
— Amrut Bharmu Sutar (@amarsutar9) July 22, 2022
गटारी नियोजन मित्र मंडळ
गटारी पार्टी - 3 idiots fame 🤣 pic.twitter.com/aEcYUuaWMx
— Nitin (@123nitin) July 24, 2022
पुण्यात मिळतो कोल्हापूरी रस्सा
काय #पुणेकर तुमचं काय मत यावर . pic.twitter.com/7mB8r5uMj6
— आपलं कोल्हापूर (@Aapalkolhapur) July 21, 2022
गटारीची तयारी करताना झिंगलेले नागोबा
गटारी अमावास्येची तयारी करताना, विविध प्रकारचे नाग.....!!
😅😂🤣
टिप : तुमच्या माहितीतील "नाग"असतील तर त्यांना टॅग करायला विसरू नका....!! #म #मराठी #गटारी pic.twitter.com/TkB97NVjGn
— Yash (@YashFoundation1) July 22, 2022
संपूर्ण वर्षभरात मांसाहार करणाऱ्यांचा खास हक्काचा दिवस म्हणजे रविवार. खरेतर देशभरातील तमाम नागरिकांचा रविवार हा सुट्टीचा दिवस असतो. अशा वेळी मांसाहार करणारे लोक आवर्जून घरी चिकन, मटण, मासे, खेकडे अंडी आणतातच. मांसाहाराबाबत तितकेसे आग्रही नसलेले आणि कधी मधी खाणारे लोक मात्र, गटारीला निश्चिती सजग असतात. ते लोक या दिवशी आवर्जून चिकन खातात. त्यामुळे ही मंडळी गटारी आमावस्येची आवर्जून वाट पाहतात. ती साजरीही करतात.