Fact Check: मुंबईतील विब्स ब्रेड फॅक्टरी कोरोना व्हायरसच्या प्रकरणानंतर सील?
कोरोना व्हायरस बनावट मेसेजच्या प्रकरणा नंतर मुंबईतील विब्स ब्रेड फॅक्टरी सील

सोशल मिडीयावर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका कामगारची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉसिटीव्ह आल्यानंतर मुंबईतील विब्स ब्रेड (Wibs Bread) कारखाना सील करण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर आणि ट्विटरसारख्या अन्य सोशल मीडिया चॅनेलवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा मेसेज पसरल्यामुळे लोक अत्यंत चिंतेत आहेत आणि त्यांनी मुंबई पोलिस (Mumbai Police) आणि बीएमसीला (BMC) दावा पडताळण्यास सांगितले आहे. लोकांनी विब्स ब्रेड खाऊ जाये असे भोटे वृत्त सोशल मीडियावर पसरवले जात आहे. विब्स ब्रेडचा कारखाना सीलबंद केल्याचा दावा खोटा असल्याचा आम्हाला आढळून आले आहे. मात्र, त्यांच्या कोणत्याही कामगाराची कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह चाचणी घेण्यात आली आहे की नाही याची अद्याप पुष्टी झालेली नाही. (Fact Check: आईसक्रीम आणि इतर थंड पदार्थांच्या सेवनाने कोविड 19 चा प्रसार होतो? PIB ने सांगितले मेसेज मागील सत्य)

LatestLY ने नुकतंच विब्स ब्रेड कारखान्याशी संपर्क साधला आणि कारखान्यातील एका कर्मचार्‍याने हा कारखाना चालू असल्याची पुष्टी केली आणि म्हटले की पुरवठा व वितरण नेहमीप्रमाणे काम करीत आहे.

बनावट व्हॉट्सअ‍ॅप संदेश

बनावट व्हॉट्सअॅप फॉरवर्ड मिळाल्यानंतर लोक काळजीत पडत असल्याचा स्क्रीनशॉट

ट्विटरवर आणखी एक यूजर होता ज्याने लोकं विब्स कारखाना बंद पडत असल्याच्या जुन्या बातम्यांची लिंक शेअर करीत आहेत आणि त्यामुळे अधिक भीती निर्माण झाली असल्याचे निदर्शनास आणून दिले. 2019 मध्ये कंपनी मालकांमधील कौटुंबिक वादामुळे विब्ज ब्रेडचे उत्पादन जसे हनीबेल केक, टुटी फ्रुटी ब्रेड आणि कंपनीने विकलेल्या 'पाव'चे उत्पादन रखडले होते.

1973  मध्ये स्थापन झालेली विब्स किंवा वेस्टर्न इंडिया बेकर्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबईच्या प्रभावशाली इराणी कुटुंबीयांकडून भागीदारी मॉड्यूल अंतर्गत चालविली जात आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ब्रेडपैकी एक आहे. Wibs फॅक्टरी सील केली गेली आहे असा दावा करणारे व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड्स बनावट आहे आणि त्यांचे काम सुरळीतपणे सुरू आहे.