कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान (Coronavirus Second Wave) सोशल मीडियावर सातत्याने चुकीच्या आणि फेक बातम्या (Fake News) पसरवल्या जात आहेत. कोविड-19 (Covid-19) च्या वाढत्या फैलावामुळे नागरिक आधीच चिंतेत असताना फेक न्यूज भर घालतात. आता सध्या एक मेसेज सोशस मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात मास्क अधिक वेळ घातल्याने शरीरात कार्बन डायऑक्साईड (Carbon dioxide) वाढून ऑक्सिजनची (Oxygen) कमतरता निर्माण होते, असे म्हटले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) यामागील तथ्य सांगितले आहे.
हा मेसेज फेक असल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे. पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "हा मेसेज खोटा असून कोरोना व्हायरस पासून सुरक्षित राहण्यासाठी मास्कचा वापर अवश्य करा." (Fack Check: विड्याच्या पानाचे सेवन केल्यास कोरोना बरा होतो? महत्वाची माहिती आली समोर)
Fact Check By PIB:
दावा: एक मैसेज में दावा किया जा रहा है कि लंबे समय तक मास्क के उपयोग से शरीर में कार्बन डाइऑक्साइड की अधिकता और ऑक्सीजन की कमी हो जाती है।#PIBFactCheck: यह दावा #फ़र्ज़ी है। #कोरोनावायरस के संक्रमण से बचाव के लिए सही तरीके से मास्क जरूर लगाएं। pic.twitter.com/ziSDpPOnhL
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 8, 2021
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी सुरक्षिततेसाठी मास्कचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्याची परिस्थिती गंभीर असल्याने काही वेळेस डबल मास्कचा वापर देखील केला जातो. दरम्यान, कोविड-19 पासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या आणि आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा.
लॉकडाऊन, कर्फ्यू, कोरोनावरील औषधे, उपाय यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून विविध बातम्या सोशल मीडिया माध्यमात फिरत आहेत. विशेष म्हणजे यामागील तथ्य जाणून न घेता त्या पसरवल्या केल्या जात आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होते. अशावेळी तथ्य पडताळणीनंतरच कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवणे, अत्यंत महत्त्वाचे आहे.