Screenshot of message asking people to apply for pension benefits under PM-SYM scheme (Photo Credits: File Image)

संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे भारत देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या या कठीण काळात सोशल मीडिया आणि इस्टंट मेसेजिंग अॅप वर अनेक खोटे मेसेजेस, फेक न्यूज व्हायरल होत आहेत. याचा वापर आतापर्यंत अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी केला जात होता. मात्र आता हे खोटे मेसेजेस पर्सनल डिटेल्स मिळवून पैसे लुबाडण्यासाठी वापरत आहेत. असाच एक मेसेज व्हॉट्सअॅप वर व्हायरल होत आहे. यात प्रधानमंत्री श्रम योगी मान धन (PM-SYM Pension Scheme) या स्किम अंतर्गत घरगुती काम करणाऱ्या कामगारांना पेन्शन देण्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच या पोस्टमध्ये पेन्शनचा लाभ घेण्यासाठीतुमच्या घरी काम करणाऱ्यांना यात सहभागी करा असे आवाहन करण्यात आले आहे.

तुमच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यात सहभागी करण्यासाठी पोस्टमध्ये एक लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यास नवीन पेज ओपन होते. तेथे तुम्ही तुमच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीची माहिती भरु शकता. हा फॉर्म google docs वर बनवण्यात आला असून त्यात dculo-mh@gov.in असा ईमेल आयडीही देण्यात आला आहे. मात्र या मेसेजची सत्यता दाखवणारी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

कामगार मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर असे सांगण्यात आले आहे की, पीएम-एसवाईएम योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तींना Common Services सेंटरमध्ये भेट देणे गरजेचे आहे. तिथे आधार नंबर, सेव्हिंग बँक अकाऊंट किंवा जन धन अकाऊंटचा वापर करुन सेल्फ सर्टिफिकेशनच्या आधारावर योजनेचा लाभ घेण्यासाठी अप्लाय करु शकतात. तसंच PM-SYM या वेबपोर्टल वर जावून मोबाईल अॅप डाऊनलोड करुन स्वतः तिथे रजिस्ट्रर करु शकतात. तुमच्याकडे देखील PM-SYM अंतर्गत पेन्शनचा लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रर करा असा मेसेज आला असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. तो मेसेज फेक आहे.