Elephant carcass (Photo Credits: ANI)

केरळ (Kerala) मधील गर्भवती हत्तीणीच्या (Pregnant Elephant) हृदय पिळवटून टाकणाऱ्या मृत्यूनंतर आता देशात अजून एक घटना समोर येत आहे. तामिळनाडू  (Tamil Nadu) मधील एका हत्तीचा (Elephant) मृत्यू झाला आहे. रिपोर्ट्नुसार, तामिळनाडू मधील मारापलम शोलायूर परिसरात (Marapalam Sholayur Area) हत्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हत्तीच्या तोंडावर जखमांच्या खुणा होत्या. त्यामुळे या हत्तीच्या मृत्यूचे कारण तपासले जात आहे. वन विभागाने (Forest Department) दिलेल्या माहितीनुसार, हत्तीच्या तोंडावर जखमांच्या खुणा असून या हत्तीच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान वन विभाग हत्तीच्या मृत्यूमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून देशातील विविध भागात हत्तीच्या मृत्यूच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच तामिळनाडू मधील हत्तीच्या मृत्यूच्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. जून महिन्यात देखील तामिळनाडूच्या कोयंबटूर येथील जंबुकंडी गावात एका 12 वर्षांच्या हत्तीच्या मृत्यूची घटना समोर आली होती. त्या हत्तीच्या तोंडावरही जखमेचे निशाण आढळले होते.

ANI Tweet:

यापूर्वी छत्तीसगढच्या सूरजपूर जिल्ह्यात एक हत्ती मृत अवस्थेत आढळला होता. तर जून महिन्यात सूरजपूर जिल्ह्याच्या प्रतापपूर वन परिक्षेत्रात दोन हत्तीणींचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला होता. या घटनेच्या एका दिवसानंतर बलरामपूर जिल्ह्यातील राजपूर रेंजमध्ये एका हत्तीचे शव मिळाले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये वीजेच्या धक्क्याने एका हत्तीचा मृत्यू झाला होता.