Viral Video: हरणाला आपल्या पंज्यात पकडून आकाशात भरारी घेताना  दिसला गरुड, व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल
Image credit : X

जंगलातले, धक्कादायक व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात, जिथे शक्तिशाली प्राणी कमकुवत प्राण्यांची शिकार करतात. व कमकुवत प्राणी स्वतःला वाचवण्यासाठी धडपडताना दिसत असतात, हरणाची शिकार करून गरुड आकाशात उडताना तुम्ही कधी पाहिले आहे का? सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हरणाची शिकार केल्यानंतर गरुड आकाशात उडताना दिसत आहे. हे दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित होतात आणि तुम्हीही हे पाहून नक्कीच थक्क व्हाल.

हा व्हिडिओ X वर @AMAZlNGNATURE नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यासोबत कॅप्शन आहे – गरुड पूर्णपणे प्रौढ हरण घेऊन जात आहे. या व्हिडिओला शेअर केल्यापासून 19.5M व्ह्यूज मिळाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले आहे - हरणाच्या शरीरासह संकरित गरुड दिसत आहे. आणखी एका युजरने लिहिले आहे - कदाचित गरुड माझ्या विचारापेक्षा मोठा असेल, असा तर तो आपल्याला उचलून सुद्धा उडू शकतो.

पहा व्हायरल व्हिडिओ

 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गरुड हरणाची फक्त शिकार करत नाही, तर त्याला पकडल्यानंतर आकाशात उडतानाही दिसत आहे. व्हिडिओमध्ये आजूबाजूला फक्त पर्वत दिसत आहेत. असे म्हंटले जाते -

की गोल्डन ईगल्स अनेकदा पर्वतांमध्ये आढळतात आणि ते खूप शक्तिशाली असतात, जे त्यांचे शिकारीचे काम अतिशय हुशारीने पूर्ण करू शकतात.