Corona पासून वाचण्यासाठी रोज 5 लीटर पाणी पिणे जीवावर बेतले; तरुण पोहचला थेट ICU मध्ये 

कोणत्याही सजीवाच्या आयुष्यात जिवंत राहण्यासाठी पाणी किती आवश्यक आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे.पण जसे काही गोष्टीचे फायदे असतता तसेच त्याचे तोटे ही असतात.याला पाणी ही अपवाद नाही. पाण्याचे ही जसे फायदे आहेत तसेच त्याचे अतिप्रमाणत सेवन केले तर त्याचे नुकसान ही होऊ शकते. हेच पटवून देणारी घटना सध्या समोर येत आहे. इंग्लंडमधील एक व्यक्ती जास्त पाणी प्यायला मुळे थेट ICU मध्ये भरती झाला आहे. (Sex With COVID-19 Patient: नर्स ने कोरोना संक्रमित रूग्णासह केले SEX ; संबंध ठेवले ते ठिकान ऐकून व्हाल थक्क )

सध्या आपण सगळेच जण कोरोना होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करत आहोत. कोरोना होऊ नये म्हणून काही घरगुती उपायही सांगितले जात आहेत. यातले अनेक उपाय whatsapp किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत असतात. त्यातून खरंच किती जण कोरोनाला दूर ठेवू शकतील ते याचा अंदाज लावता येणार नाही. मात्र असाच घरगुती उपाय इंग्लंडमधील तरुणाच्या अंगाशी आला आहे.इंग्लंडमधील ब्रिस्टल शहरात 34 वर्षांचा सिव्हिल सेवक ल्यूक विल्यमसन आपल्या कुटुंबासमवेत राहतो.ब्रिटनमध्ये राहणाऱ्या ल्यूकला वाटले की तो कोरोना पॉझिटिव्ह आला आहे आणि त्याला असे वाटले की जर त्याने आपल्या रोजच्या पिण्याच्या पाण्याचे प्रमाण दुप्पट केले तर तो कोरोनाचा पराभव करू शकेल. (Deer Spotted In Pune: गवा दिसला, आता पुणे येथे हरणांचा कळप करतोय मुक्तसंचार; शिवणे परिसरात मानवी सोसायटीत वावर)

सामान्य माणसाला दिवसाला एक ते दोन लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. ल्यूकने त्याच्या पाण्याचे प्रमाण 4-5 लिटर पर्यंत वाढवले, ज्यामुळे त्याच्या शरीरात सोडियम पातळी कमीझाली.आणि याच कारणामुळे ल्यूक   एक दिवस जमिनीवर कोसळला. ल्यूकच्या पत्नीने सांगितले की 'तो संध्याकाळी अंघोळ करायला गेला आणि अचानक बाथरूममध्ये कोसळला.' तिने अस ही सांगितले की, ऍंबुलस येण्यापूर्वी 20 मिनिटे लूक बेशुद्ध झाला होता आणि प्रतिक्रिया देत नव्हता. डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितले की, तो बर्‍याच दिवसांपासून जास्त पाणी पित आहे, ज्यामुळे त्याच्या शरीरातील मीठाची पातळी खूपच कमी झाली आहे आणि म्हणूनच ल्यूकची प्रकृती खूपच खालावली. त्याला दोन-तीन दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.तो व्हेंटिलेटरवर होता . सध्या ल्यूक आता त्याच्या प्रकृतीकडे लक्ष देत आहे.