Donkey Attack On Elderly Man In Kolhapur: कोल्हापुरात गाढवाचा वृद्धावर जीवघेणा हल्ला; Watch Video
Donkey Attack On Elderly Man In Kolhapur (PC- Twitter)

Donkey Attack On Elderly Man In Kolhapur: कोल्हापुरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीवर गाढवाने अचानक जीवघेणा हल्ला केल्याच दिसत आहे. गाढव सामान्यतः त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात, परंतु CCTV मध्ये कैद झालेल्या घटनेत एक गाढव आक्रमकपणे एखाद्या व्यक्तीवर बराच काळ हल्ला करत असल्याचे दिसून येते. सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापुरात घडली. फुटेजमध्ये एक म्हातारा माणूस रस्त्याने चालताना दिसत आहे तर एक निरुपद्रवी दिसणारे गाढव शेजारी उभे आहे. अनपेक्षितपणे, गाढव जोरात वेगाने माणसाकडे धाव घेते आणि जोरदार धडक देते.

गाढवाने वृद्ध व्यक्तीला केवळ धडक दिला नाही तर त्याला पायाखाली तुडवले. येथील लोक या व्यक्तीच्या मदतीला धावून येतात पण त्यांना गाढवापासून या व्यक्तीला वाचवता येत नाहीत. येथील लोकांनी या गाढवावर दगडफेक आणि काठीने हल्ला केला. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करूनही गाढवाचं हल्ला करणं सुरूच होतं. (हेही वाचा - World's Richest Beggar: जगातील सर्वात श्रीमंत भिकारी कोण आहे? मुंबईतील भिकारी Bharat Jain यांची संपत्ती जाणून उडेल तुमची झोप)

धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या तीन दिवसांत कोल्हापुरातील गांधीनगरमध्ये गाढवाने माणसांवर हल्ला केल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी झालेल्या हल्ल्यात 13 जण जखमी झाले होते. या प्राण्यांच्या हल्ल्याबाबत अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही अद्यापपर्यंत कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही.