Dog Funny Video: स्वत:ला आरशात पाहून घाबरला कुत्रा; व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही हसाल
Dog Funny Video (Photo Credits: Twitter)

Dog Funny Video: सोशल मीडियावरप्राण्यांचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होतात. त्यातील अनेक व्हिडिओ आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात, तर अनेक व्हिडिओ आपल्याला आश्चर्यचकित करतात. सध्या सोशल मीडियावर एका कुत्र्याचा एक सुपर क्यूट व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कुत्रा स्वतःला आरशात पाहून इतका घाबरतो की, तो लगेचचं आपला जीव वाचवण्यासाठी धावतो. व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच हसू येईल. ट्विटरवर @buitengebieden_ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओला शेअर केल्यापासून, 553.6K व्ह्यूज मिळाले आहेत आणि 34.1K लोकांनी तो लाइक केला आहे. यावर लोकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, मी जवळजवळ एकदाचं स्वतःला मारले आहे. तर दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले आहे, त्याचे सकाळचे केस माझ्यापेक्षा चांगले आहेत. (वाचा - Monkey Opening Girl's Pant: बदमाश माकडाने उघडली मुलीच्या पँटची चेन; व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक गोंडस कुत्रा आपल्या नादात चालताना दिसत आहे. चालत असताना तो अचानक आरशाजवळ येतो आणि त्यात स्वत:ला पाहून तो इतका घाबरला की, तो तिथून उडी मारून पळून जातो. वास्तविक, आरशात स्वत:कडे पाहताना, कुत्र्याला असे वाटते की पलीकडे कोणीतरी आहे, म्हणून तो घाबरतो. हा मजेदार व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसायला येईल.