कुत्रा आणि मांजरीने एकत्र केली स्कुटर सफर; Guinness World Record मध्ये नोंद (Watch Video)
Dog & Cat Together makes World Record (Photo Credits: Instagram)

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Record) कुत्रा (Dog) आणि मांजरीच्या (Cat) विक्रमाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात कुत्रा आणि मांजर एकत्र स्कूटर सफर करत आहेत. त्याचबरोबर सायकल बसून धक्का देणे असे गंमतीशीर प्रयोग करताना हे दोघे दिसत आहेत. यांची या कृती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने इंस्टाग्रावर शेअर केलेला व्हिडिओ 4.37 सेकंदांचा आहे.

GWR2022 बुक चे स्टार सशिमी (एक 7 वर्षांची बंगाली बिल्ली) आणि लॉलीपॉप (5 वर्षांचा बोस्टन टेरियर) एकमेकांचे चांगले मित्र आहेत. लॉलीपॉप आणि सशिमी या दोघांनी एकत्रितपणे स्कूटर सफारीचा आनंद घेतला. ते दोघे एकत्र स्कूटर चालवतील असे मला कधी वाटले नव्हते, असे @the_ultimutts च्या ट्रेनर मेलिसा मिलेट म्हणाल्या. दरम्यान, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्चा पाऊस पडत आहे.

पहा व्हिडिओ:

(Dog Viral Video: चक्क कुत्रा करतोय सिक्युरीटी गार्डची ड्युटी; गेट उघडण्यापासून ते रजिस्टरमध्ये एन्ट्री करण्यापर्यंत चोख करतोय काम, पहा व्हिडिओ)

या व्हिडिओला 21 हजारहून् अधिक लाईक्स आणि व्ह्ुज मिळाले आहेत. त्याचबरोबर लॉलीपॉप आणि सशिमी यांचे कौतुक करणाऱ्या कमेंट्सही येत आहेत. दरम्यान, यापूर्वी प्राण्यांच्या बुद्धीमत्तेचे आणि कलेचे दर्शन घडवणारे अनेक व्हिडिओज आपण पाहिले असतील. परंतु, हा व्हिडिओ खरंच खास आहे. विशेष म्हणजे कुत्रा आणि मांजर यांचे पटत नाही, असे म्हटले जाते. मात्र या व्हिडिओतील या दोघांची गट्टी पाहून प्रत्येक नियमाला अपवाद असतो, हे त्यांनी सिद्ध केले आहे.