Dance Performance Viral Video: इंटरनेटवर सोशल मीडियाने केलेली धमाल कमी होती की काय म्हणून आता त्यात रिल्स आले आहेत. रिल्स आल्यापासून अनेकांना आपणच हिरो, डान्सर आणि मोटवेशनल हिरो असल्याची भावना येऊ लागली आहे. त्यामुळे अनेक लोक रिल्स बनवून ते सोशल मीडयावर अपलोडही करत आहेत. त्यातील अनेक रिल्स चांगलेच व्हायरल होतात. आताही इन्स्टाग्रामवर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक साडी नेसलेली देसी अंटी डान्स करताना दिसत आहे. हा डान्स तसा गुणवत्तेच्या बाबतीत तोळामासाच आहे. तरीही सोशल मीडियावर हा डान्स अनेकांना आवडला आहे. आपणही हा डान्स येथे पाहू शकता.
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एक महिला अलका याज्ञिक (Alka Yagnik) यांच्या 'देख की मेरी जवानी' गाण्यावर डान्स करताना दिसते. तिच्या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि तो इंटरनेटवर व्हायरलही झाला आहे. अनेकांनी तिच्या नृत्य कौशल्याचे कौतुक केले, तर काहींनी तिच्या 'लटके झटके'चे कौतुक केले. तर काहींनी तिच्यावर भलतीच टीका केली आहे.
मंजुला वर्मा नावाच्या इंस्टाग्राम यूजरने हा व्हिडिओ आपल्या पेजवर शेअर केला आहे. महत्त्वाचे म्हणजे या अलका याज्ञीक यांच्या गाण्यातील हुक-स्टेप या महिलेने चांगल्या केल्या आहेत. त्यामुळे तिचे अधिक कौतुक होताना दिसत आहे. हा व्हिडिओ ऑनलाइन शेअर केल्यानंतर व्हिडिओला 30,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. (हेही वाचा, Viral Video: Dhadhang Dhang गाण्यावर लाल साडीतील देसी मुलीच्या सेक्सी डान्सने इंटरनेटवर घातला धुमाकूळ; Watch)
व्हिडिओ
View this post on Instagram
व्हिडिओ पाहून एका युजरने म्हटले आहे की, हे खूप सुंदर आहे. दुसऱ्या कोणीतरी म्हटले की, फारच मनमोहक. तिसरा युजर म्हणतो की, हा व्हिडिओ मी किती वेळा पाहिला मलाच आठवत नाही. कदाचित हा व्हिडिओ मी 50 पेक्षा जास्त वेळा पाहिला असेल.