Viral Video: अपघात आई गमावलेल्या चार कुत्र्यांच्या पिल्लांची भूक गाईच्या दूधाने भागवली, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
Cow Feeds 4 Puppies (Photo Credits: You Tube)

कोणत्याही स्त्रीमध्ये नैसर्गिकरित्याच उपजत मातृत्त्व असतं. मग तो माणूस असो किंवा प्राणी. सध्या सोशल मीडियावर चार नवजात कुत्र्याची पिल्लं एका गाईला बिलगून दूध पित असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियात पसरत असलेल्या माहितीनुसार या पिल्लांना जन्म देणारी त्यांची आई एका अपघातामध्ये मृत पावली. त्यानंतर जवळच रस्स्त्याच्या कडेला असणार्‍या गायीला ती बिलगून दूध पित आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील आहे. सोशल मीडियात नेटीझन्सनी या व्हिडिओवर काही इमोशन प्रतिक्रिया लिहल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी माकडाच्या पिल्ल्यांसोबतही असाच एक प्रकार घडला होता. त्यावेळेस कुत्रीणीने माकडांच्या पिल्लांना आसरा दिला होता. त्यांना दूध दिल्याचं समोर आलं होतं. प्राण्याच्या एका प्रजातीच्या पिल्लांना दुसर्‍या प्रजातीने सांभाळल्याचं अनेकदा समोर आलं आहे.