Viral Video : Fitness Freak मांजर जेव्हा Workout करते
Fitness freak Cat( Photo Credit: Twitter )

Fitness Freak Cat : निरोगी आरोग्याचा मंत्र तुमच्या जीवनशैलीमध्ये असतो. पुरेशी झोप, योग्य आहार आणि व्यायामाच्या मदतीने तुम्ही आरोग्याच्या अनेक समस्या दूर ठेवता येतात. पण फीटनेस फ्रीक (Fitness Freek) फक्त माणसंच असतात असं नाही सध्या एका फीटनेस फ्रीक मांजरीचा व्हिडिओदेखील सोशलमीडियावर चांगलाच गाजत आहे. एक मांजर कारच्या खाली सीट अप्स (Sit Up) करत असल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर झपाट्याने शेअर होत आहे.

चीनची राजधानी बीजिंगमधील (Beijing )  एका व्हिडिओमध्ये चक्क मांजर वर्कआऊटकरत आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका गाडीच्या खाली टेकून मांजर चक्क सीट अप्स करत होती. काही दिवसांपूर्वी अपलोड केलेल्या वर्कआऊट फ्रीक मांजरीच्या व्हिडिओला अल्पावधीतच तुफान व्ह्यूज मिळाले आहेत.  एका दिवसात 21.1 हून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहण्यात आला आहे.

अगदी नेहमीचा सराव असल्याप्रमाणे एक पांढर्‍या रंगाचं मांजर गाडीखाली सीट अप करत होते. गाडीच्या पाठच्या बाजूला बंपरजवळ हाताच्या पंजांनी 2-3 मिनिटं वर्कआऊट करत होती. काही वेळ ब्रेक घेऊन पुन्हा मांजर करायला लागलं.