जगात अनेक प्रकारचे, स्वभावाचे लोक असतात. यातील काही लोक आपल्या अजब वागण्यामुळे चर्चेचा भाग ठरतात. आजकाल तर सोशल मिडियामुळे असे लोक क्षणार्धात व्हायरलही होतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती चक्क ‘मिल्क बाथ’ (Milk Bath) घेताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती दुधाने भरलेल्या बाथटबमध्ये आरामात आंघोळ करीत आहे. तसेच मगच्या मदतीने ही व्यक्ती आपल्या अंगावर दुघ ओतून घेत आहे. हा व्हिडिओ तुर्कीच्या (Turkey) डेअरी प्लांटचा (Dairy Plant) आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या डेअरी प्लांटला बंद करण्यात आले.
हुर्रियत डेली न्यूजच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ मध्य अनाटोलियन प्रांतातील कोन्या एका दुग्धशाळेत शूट केला गेला आहे. बाथटबमध्ये दुघाने अंघोळ करत असलेल्या व्यक्तीचे नाव एमरे सायर असे आहे. हे फुटेज उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त झाला होता. अल्पावधीतच हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होऊ लागला. सर्वप्रथम तो टिकटॉकवर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र यावर स्पष्टीकरण देताना डेअरीशी संबंधित प्रशासनाने म्हटले आहे की ते दूध नव्हते तर सफाई करण्याचे लिक्विड आणि पाणी होते.
Bir süt fabrikasında çekilen ve Tiktok'ta paylaşılan 'süt banyosu' videosu.
Fabrikanın 'Konya'da olduğu' iddia ediliyor. pic.twitter.com/erkXhlX0yM
— Neden TT oldu? (@nedenttoldu) November 5, 2020
ज्याने हा व्हिडिओ अपलोड केला आहे त्याचे नाव युगुर तुर्गुट आहे. या दोघांना अटक केली आहे. डेअरी प्लांटच्या प्रशासनाचा असा विश्वास आहे की हा व्हिडिओ केवळ कंपनीच्या प्रतिमेस नुकसान पोहोचवण्यासाठी बनविला गेला आहे. या व्हिडिओमध्ये वापरलेले लिक्विड बॉयलर साफ करण्यासाठी वापरले जाते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कोन्या कृषी व वनीकरण व्यवस्थापक अली एर्गिन यांनी घटनेच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत. सध्या ही डेअरी बंद करण्यात आली आहे. एर्गिनचे म्हणणे आहे की, 'लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशा काही गोष्टी इथे घडल्या आहेत, म्हणूनच डेअरी बंद केली आहे याशिवाय या डेअरीवर दंडही आकारण्यात आला आहे.