प्राणीप्रेमी पर्यटक अनेकदा प्राणी संग्रहालयाला (ZOO) भेट देतात, या पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी कित्येक संग्रहालयात वाघ, सिंह, घोडे या प्राण्यांची साहसी प्रदर्शने हा कार्यक्रम ठरलेला असतो, पण या कार्यक्रमासाठी प्राण्यांना तयार कसे केले जाते माहित आहे का? प्राण्यांची मानसिक तयारी नसताना त्यांना जावबरदस्तीचा मार्ग देखील हे संग्रहालयाचे प्रशिक्षक वापरायला मागे पुढे बघत नाहीत. अशाच प्रकारची दुर्दैवी घटना अलीकडे थायलंड मध्ये पाहायला मिळाली आहे. पर्यटकांना मनोरंजन म्ह्णून एका हत्तीच्या पिल्लाला जबरदस्ती नाचायला लावले गेले असताना त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, ही जखम भरून न निघाल्याने डंबो (Dumbo) या हत्तीच्या पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजत आहे. या घटनेची पुष्टी करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
(व्हायरल व्हिडीओ)
सूत्रांच्या माहितीनुसार, डंबो या पिल्लाला थायलंड झू मध्ये आल्यापासून दिवसाला तीन वेळा पर्यटकांसाठी नाचून दाखवायला सांगितले जायचे. काहीच दिवसांनी या तीन वर्षाच्या छोट्या हत्तीला संसर्गाचा त्रास व्हायला लागला. मात्र तरीही त्याला जबरदस्ती करून नाचायला लावलं आणि त्यावेळी तो संसर्गित वेदना सहन न झाल्याने जमिनीवर कोसळला. मात्र यानंतर देखील चार दिवस कोणतेही उपचार न करता या डंबो ला अधिकाऱ्यांकडून नाचवलं जायचं, चौथ्या दिवशी डंबोची तब्येत अगदीच खालावली आणि मग त्याला जवळच्या प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांच्या रिपोर्ट्स नुसार या हत्तीचे मागच्या दोन पायांचे हाड तुटले होते, उपचारादरम्यान तिसऱ्या दिवशी डंबोचा मृत्यू झाला.
या घटनेच्या निषेधार्थ मुविंग ऍनिमेल्स या गटचत्या कार्यकर्त्यांनी डंबोळे जबरदस्ती नाचायला लावल्याचा व्हिडीओ सोशल मेंदुवर पोस्ट करत या प्राण्यांच्या सुटकेची मागणी केली आहे. याशिवाय जवळपास 22,000 प्राणीप्रेमींच्या स्वाक्षऱ्या असलेलं एक पत्रक देखील या गटाने जाहीर केलं आहे.या घटनेची माहिती देत, मूव्हिंग ऍनिमेल्स गृपच्या अधिकृत फेसबुक अकाउंट वरून एक पोस्ट करण्यात आली होती, ज्यात फूकेट झू पासून प्राण्यांच्या सुरक्षेला धोका आहे, डंबोचा मृत्यू हा प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीमुळेओढवला आहे. एखाद्या प्राण्याला संसर्ग झाला त्यानंतर त्याच्या पायाचे हाड मोडले आणि तरीही अधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ नये हे कितपत योग्य म्हणता येईल अशा आशयाचा सवाल संग्रहालयाला केला जात आहे.
यावर प्रत्युत्तर देताना झू चे मॅनेजर पिचाई सुंकरसोन यांनी डंबोवर अत्याचार होत असल्याचा दावा चुकीचा आहे असे सांगितले.