Photo Credit- Pixabay

आपण आपल्या मित्रांसह फिरायला गेलात आणि आणि तिथे असे काही घडेल जे तुमच्या जीवावर बेतले तर काय होईल? आफ्रिकन देश केनियामध्येही (Kenya) असेच एक प्रकरण समोर आले आहे. तेथे मुचेना (Dicken Muchena) आपल्या तीन मित्रांसह स्पीडबोट मधून पाणघोडे (Hippos) पाहण्यासाठी लेक व्हिक्टोरिया येथे गेले होते. पण अचानक एका हिप्पोपोटॅमसने त्यांना असे पळवले आणि मोठ्या अडचणीने त्यांचा जीव वाचला.पाहूयात हा प्रकार नक्की का घडला. (जेव्हा सारस पक्षी चोचीत तलावातील मासा समजून सापाला पकडतो तेव्हा काय होत ते तुम्हीच पाहा ( Watch Viral Video )

चार मित्र पाणघोड़े पाहण्याच्या उद्देशाने केनियामधील व्हिक्टोरिया लेक येथे गेले होते आणि त्यांचे स्वप्न सत्यात उतरले. त्यांनी तलावामध्ये चार पाणघोडे आनंद घेत असताना पाहिले, परंतु अचानक एका हिप्पोपोटॅमसला राग आला. (Viral Video: एका माशाने सापाला केले गिळंकृत, त्यानंतर जे झाले ते पाहून तुम्हीही व्हाल अचंबित )

डिकेन मुचेना (Dicken Muchena)  मित्रांसाठी ही ट्रिप तेव्हा जास्त भयानक ठराली जेव्हा जेव्हा संतप्त हिप्पोने त्यांचा पाठलाग सुरू केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.डेलीमेलच्या वृत्तानुसार, डिकन मुचेना म्हणाले, 'आम्हाला माहित आहे की या भागात हिप्पोपोटॅमस आढळतात आणि आम्हाला त्यांची काही छायाचित्रे घ्यायची होती. आम्हाला माहित आहे की ते प्राणघातक प्राणी आहेत, म्हणून आम्ही त्यांच्या जवळ जाऊ शकलो नाही. पण अचानक हिप्पोपोटॅमस रागावला आणि आमच्यामागे येऊ लागला.हिप्पो हे तिसरे सर्वात मोठे सस्तन प्राणी आहे. त्यांचे वजन 1300 ते 1500 किलो आहे आणि जगातील सर्वात प्राणघातक लँड सस्तन प्राणी मानले जाते.